महात्मा फुलेंचे कार्य प्रेरणादायी - विजय चौधरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 28 नवंबर 2018

महात्मा फुलेंचे कार्य प्रेरणादायी - विजय चौधरी.


सेलू प्रतिनिधी

महात्मा फुलेंनी शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणले, शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका परखडपणे मांडली. समाजात समता ,बंधुता निर्माण करण्याचे प्रयत्न केले. म.फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन केले.
विवेकानंद विद्यालय , सेलू येथे महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की , पिढीजात चालत आलेल्या अमानवी अश्या धार्मिक रूढी व परंपरा बंद झाल्याशिवाय समाजामध्ये परिवर्तन होणार नाही हे फुलेंनी ओळखले होते. सामाजिक सुधारणासाठी व्यापक योगदान देवून  आपल्या मानवतावादी भूमिकेतून वंचित व उपेक्षित घटकांना मुख्य समाजप्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी केले.
एक स्त्री सुशिक्षित झाली म्हणजे पुढच्या सर्व पिढ्या सुशिक्षित होतात हे समीकरण त्यांनी जाणले व या पवित्र कार्याची सुरुवात आपल्या पत्नीला शिक्षण देवून केली.बालविवाह ,सतीप्रथा , केशवपन या  वाईट परंपरांना विरोध केला. शेतकरी व शेतमजूर यांच्या हलाखीच्या परिस्थिती चे वर्णन शेतकऱ्यांचा आसुड या ग्रंथांतून केले.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे ही मागणी त्यांनी केली.सत्यशोधक समाजाची स्थापना करून वंचितांना न्याय दिला.
निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक । भांडणे अनेक कश्यासाठी । हा त्यांचा सत्यधर्माचा व मानवताधर्माचा संदेश आजही अनुकरणीय ठरतो असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु.अ. बळवंत देशमुख होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद मंडलिक , शंकर राऊत , दीपाली भावसार , संध्या शोभने ,चेतन नाईक , सतीश भुजबळ ,श्रीपाद जोशी यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें