सिल्लोड शहरात जनसंपर्क अभियानास प्रचंड प्रतिसाद ; सिल्लोड नगरपरिषदअंतर्गत नागरिकांच्या विविध समस्यांवर मात -- नगराध्यक्ष अब्दुल समीर; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 नवंबर 2018

सिल्लोड शहरात जनसंपर्क अभियानास प्रचंड प्रतिसाद ; सिल्लोड नगरपरिषदअंतर्गत नागरिकांच्या विविध समस्यांवर मात -- नगराध्यक्ष अब्दुल समीर;


सिल्लोड (प्रतिनिधी)26/11/2018.
प्रदेश काँग्रेसने सुरु केलेल्या संघर्षयाञेनंतर जनसंपर्क अभियानास राज्यभर सुरुवात झाली असुन जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली माजीमंञी आ. अब्दुल सत्तार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड शहरात जनसंपर्क अभियानास सिल्लोड शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जनसंपर्क अभियानाचे सिल्लोड शहरातील नागरिकांनी ठिक ठिकाणी स्वागत केले जात असुन शहरातील नागरिकांच्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेतल्या जात असुन नगरपरिषदअंतर्गत विविध विकास योजना राबविण्यात येत असुन विविध अडी अडचणींवर तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहे .
रविवार (दि 25)रोजी सिल्लोड शहरातील बालाजी नगर,जय भवानी नगर या भागातील नागरिकांशी संपर्क करुन केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणाविषयीची माहिती नागरिकांना देण्यात आली. वार्डा - वार्डातील नागरिकांच्या अडी अडचणी समस्या जाणून घेत तातडीने समस्यांचे निवारण करण्यात आले.
सदरील अभियानात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ , रईस मुजावर पठाण, राजरत्न निकम, सुनिल दुधे,शेख बाबर बागवान,संजय फरकाडे, संजय मुरकुटे,कुणाल सहारे,मधुकरराव बेंडाळे,अमित आरके, अब्दुल बासित,फईम पठाण,तौसिफ पठाण, आदिंसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें