वाळू धक्के सुरु करा=यासाठी जिंतूर तहसीलवर मजूराचा भव्य मोर्चा! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 16 नवंबर 2018

वाळू धक्के सुरु करा=यासाठी जिंतूर तहसीलवर मजूराचा भव्य मोर्चा!

जिंतूर/ निशाद आहेमद.
जिंतूर तालुक्यातील वाळू धक्के बंद असल्यामुळे बांधकाम मजुरांवर उपासमारी होत आहे म्हणून अनेक वेळी निवेदने देऊन हि प्रशासन दखल घेत नाही म्हणून तालुक्यातील बांधकाम मजूरांनी दि.१६ नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आले होते.

    मागील दोन वर्षापासून जिंतूर तालुक्यातील सर्व वाळूचे धक्के बंद आसल्यामुळे  सर्व खाजगी बांधकाम वाळू अभावी ठप्प झाली त्यामुळे गोरगरीब मजूरांच्या हाताला कामे नाही तसेच दैनंदिन उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्यामुळे या मजूरावर उपसमारीची वेळ अली आहे म्हणून शासन व प्रशासनाने यांनी यांची गंभीर दखल घ्यावी म्हणून हजारो बांधकाम मजूरांनी दि.१६ नोव्हेंबर,शुक्रवार रोजी निवासी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनात असे नमूद केले कि आमच्या हाताला काम नसल्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा झालेला आहे म्हणून प्रशासनाने आमच्या या मागणीची दखल घेऊन वाळूचे धक्के त्वरित चालू करून आम्हाला न्याय द्यावे  तालुक्यातील सर्व मंजूर बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी मंचावर उपस्थित मुक्ती कलीम बेग मिर्झा यांनी सांगितले कि वाळू धक्के प्रशासकीय स्तरावर बंद आहे मात्र रात्री अवैध रित्या अव्वाची सव्वा दराने वाळू चोरुण विक्री होते, तसेच शेख शब्बीर ,राहील खाण, खालेख राज,आदीनी आपली मते व्यक्त केली,या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी शेख कलीम,सय्यद बरकत,शेख शकील, हरून खान, हुसेन खान,शेख ,शेख हशम,शेख बबलु,आदीनी परिश्रम घेतले.
       
  शेख शब्बीर यांनी सांगितले कि वाळू बंद असल्यामुळे आमच्यावर उपासमारी होत आहे जर २५ तारखे पर्यंत वाळू धक्के चालू करा नसता आम्ही सर्व बांधकाम मंजूर  तहसील कार्यालयावर संपूर्ण परिवारासह मोर्चा काडून धरणे आंदोलने करु असे मत व्यक्त केले.
           
राहील खान  आक्रमक             बांधकाम मजूर  जर वाळू धक्के चालू नाही केले तर आम्ही महामार्गावर रास्ता रोको करणार आहे.म्हणून शासनाने आमच्या मागणीचे गंभीर दखल घ्यावी. तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी सांगितले कि आम्ही या मंजूराची मागणी प्रशासनाला त्वरित कळवू आणि त्वरित वाळू धुक्का चालू करण्याचा प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करु असे मत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें