ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या विधानसभेत मांडणार - आ.अब्दुल सत्तार; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 नवंबर 2018

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या विधानसभेत मांडणार - आ.अब्दुल सत्तार;

सिल्लोड तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचे आ.अब्दुल सत्तार यांना निवेदन सादर;

सिल्लोड (प्रतिनिधी)दि 22/11/2018.
सिल्लोड तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या समस्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांना सादर करण्यात आले. यावेळी आ.अब्दुल सत्तार यांनी ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या जाणून घेत ग्रामसेवकांचा हा गंभीर प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र शासनाने 2006 पासुन प्रत्येक गावात एक ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही महत्वाकांक्षी योजना आहे. मागील आघाडी सरकारच्या काळात खुप महत्वाची कामे करण्यात आली आणि ग्राम रोजगार सेवकांना योग्य न्याय मिळवून देण्यात आला. माञ युती सरकारच्या काळात ग्राम रोजगार सेवकांच्या बाबतीत एकही योग्य निर्णय घेण्यात आलेला नाही. महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांमध्ये ग्रामरोजगार सेवकांना पगार दिला जातो.मध्यप्रदेश मध्ये तर ग्राम रोजगार सेवकांना ग्राम सचिव पदावर नेमणूक करुन पगार चालू करण्यात आली आहे.
रोजगार हमी योजनेचा उगम महाराष्ट्रातून झालेला असतांनाही महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे व शासनाचे रोजगार हमी योजना बंद करण्याचे षडयंत्र चालू आहे. कामाचे प्रमाणात 2.25 % प्रमाणे मानधन देण्यात येते. ग्राम रोजगार सेवकांना पुर्ण वेळाचा दर्जा देण्यात यावा.मासिक 18000 रुपये वेतन देण्यात यावे. रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात यावीत अशा विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे तालुकाअध्यक्ष काकासाहेब बावस्कर,तालुका उपाध्यक्ष संजय दांडगे,तालुका सचिव दत्ता शिंदे,मतीन पठाण,राधाकिसन मैंद,कैलास पालोदे,सचिन पवार, विजय लहाने,श्रीरंग वाघ,दत्तु गोराडे,सोनाजी दांडगे,एकनाथ आहेर,भास्कर बडक,सदाशिव शिंदे,गजानन शिंदे,दत्तु गव्हाणे,दिलीप कालभिले,संतोष पारखे,आदिंसह ग्राम रोजगार सेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें