कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे गोवर रुबेला लसीकरण मोहीमचा शुभारंभ महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय करंजखेड येथे करण्यात आला।या मोहीम चा शुभारंभ करंजखेडचे सरपंच सय्यद हय्यास यांचा हस्ते करण्यात आला। साधारण दीड महिना चालणा-या लसीकरण मोहिमेत ९ महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना शासकीय, खासगी शाळा, अंगणवाडी आणि शाळाबाह्य बालकांना गोवर, रुबेला लस विनामुल्य देण्यात येणार आहे।या लसीकरणाचा सर्व पालकांनी बालकांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन डॉ शोएब सय्यद यांनी दिले।या प्रसंगी उपस्थित माजी सरपंच भगवान कोल्हे , अनिल कोल्हे, डॉ शोएब सय्यद व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय चे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें