शासकीय अधिकाऱ्यांविना होणारा पिक कापणी प्रयोग शेतकऱ्यांनी पाडला बंद,चौकशीची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 1 नवंबर 2018

शासकीय अधिकाऱ्यांविना होणारा पिक कापणी प्रयोग शेतकऱ्यांनी पाडला बंद,चौकशीची मागणी.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०१नोव्हेंबर २०१८.

सोनपेठ तालुक्यातील वैतागवाडी येथे ईफ्को टोकीयो या इन्शुरन्स कंपनी च्यावतीने घेण्यात येणारा पिक कापणी प्रयोग, शासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत चालु असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तो बंद पाडला.
तालुक्यातील वैतागवाडी येथील हनुमान भागवत निळे यांच्या शेतात कापसाच्या दुसऱ्या वेचणीच्या पिक कापणी प्रयोगास कुठलाही शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रासपा चे तालुका अध्यक्ष राम मरगळ यांनी आक्षेप घेतला व पिक कापणी प्रयोग बंद करून या बाबत तक्रार केली.  पिक कापणी साठी आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बसवुन ठेवले त्यानंतर मंडळ अधिकारी कराड व इतर शासकीय कर्मचारी हजर झाले. परंतू या पिक कापणी प्रयोगाचा पंचनामा झाल्याशिवाय कुठल्याही कर्मचाऱ्यांना जाऊ न देण्याची भुमिका शेतकऱ्यांनी घेतली. तहसीलदार जिवराज डापकर यांनी संबधित शेतावर जाऊन सदरील पिक कापणी प्रयोगाचा पंचनामा केला व या प्रकरणाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येनार असल्याचे सांगितले. पिक कापणी प्रयोग करतांना गाव पातळीवर असलेल्या समितीच्या सर्व सदस्यांनी हजर राहाणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बाबत कंपनीला स्पष्ट सुचना देण्यात येतील असेही सांगितले.
या वेळी शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू, अमोल बचाटे, आण्णा जोगदंड यांच्या सह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें