सोनपेठ (राजेश खेडकर) दि.३१ऑक्टोबर २०१८.
येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय एकता व राष्ट्रीय संकल्प दिवस सरदार वल्लभभाई पटेल जयंती व माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी याच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. वसंत सातपुते हे होते तर प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य शेख शकिला होत्या.
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बलिदान दिन राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून पाळला जातो, या निमित्ताने रा. से. योजनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयोचे प्रा.डॉ.बापुराव आंधळे, सुत्रसंचालन प्रा. डॉ. शिवाजी अंभुरे तर आभार प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी मानले कार्यक्रम प्रसंगी प्रा.सखाराम कदम, प्रा.डॉ.अनंत सरकाळे, प्रा. दिलीप कोरडे, प्रा.मंगल गव्हाणे, प्रा.जीवन भोसले, प्रा.कैलास आरबाड, प्रा.आरती बोबडे, रमेश काळे, रंगनाथ चोंडे, भागवत हाके, संतुक परळकर, संतुक कुलकर्णी, दत्ता सोनटक्के व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें