निष्ठावंत शिवसैनिकेला मिळाला न्याय शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सुरेश ढगे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 9 अक्टूबर 2018

निष्ठावंत शिवसैनिकेला मिळाला न्याय शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सुरेश ढगे.



 सेलू प्रतिनिधी शमशेर खान
पाथरी तालुक्यातील वरखेड गावात बालपण घालवलेल्या सुरेश ढगे यांचे शिक्षण सेलू येथे झाले. शिक्षण शिकत असतांनाच समाजासाठी काहीतरी करावे ही अंतरिक इच्छा स्वस्थ बसू देईला अन् १९९२ साली वरखेड या आपल्या गावात शिवसेनेची शाखा स्थापन करून सामाजिक जीवनाची मुहूर्तमेढ रोवली. या मतदार संघाचे तत्कालीन आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत असतांनाच समाजातील अनेक प्रश्न
सोडविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि तो आजपर्यंत कायम आहे. निष्ठावान शिवसैनिकाला न्याय मिळाला अशी प्रतिक्रीया सर्वसामान्यांतून व्यक्त होतांनादिसून येत आहे.सुरेश ढोगे हे १९९६ साली सर्कलप्रमुख झालेत्यानंतर १९९९ ते २००६ पर्यंत पाथरी तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच वरखेड गावचे सरपंच, पाथरी बाजार समितीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २००६ मध्ये
परभणी उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्य पाहिले. शिवसेनेश एकनिष्ठ राहुन
सामाजिक कार्य सुरुच ठेवले. अनेक आंदोलनात त्यांनी भाग घेतला.गोदावरी साखर कारखाना चालु करण्याबाबत, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन तसेच सर्व सामान्य लोकांना त्रास झाला तर
तर रस्त्यावर उतरून दोन हात करण्याची तयारी असणारा असा कणखर नेता म्हणुन ओळख निर्माण केली. सुरुवात हरिभाऊ लहाने यांच्या खाद्याला खांदा लावून काम
केले. नंतर खा सजय जाधव यांचा सच्चा कार्यकर्ता असुन वेळोवेळी खा जाधव यांनी कुठल्याही वेळी धावून येत.मा आ हरिभाऊ काका लहाने यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता तरी शरेश ढगे यांनी पाथरी येथे शिवसेना अधिक मजबूत
करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. निवडणूक लढवितांना पराभवाला कधी खचून न जाता
पुन्हा नव्याने जोमाने कामाला लागणारा एक
निष्ठावान कार्यकर्ता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. याचा फायदा येणाऱ्या काळात शिवसेनेला होणार आहे आज सामान्य शिवसैनिकेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें