नवीन ईमारतीचे बांधकाम पुर्ण; रुग्न सेवा सुरु करण्याची नागरिकांची मागणी.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२९ऑक्टोबर २०१८
केवळ वरिष्ठांच्या दुर्लक्षामूळे सोनपेठ येथील बांधून तयार झालेली ग्रामीण रुग्णालयाचीवास्तू गेली दोन महिन्यांपासून उदघाटणाच्या प्रतीक्षेत आहे. संपुर्ण बांधकाम पुर्ण होऊनही तिथे रुग्न सेवा सुरु होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. या नविन ईमारतीमध्ये लवकर रुग्नालय सुरु केले नाही तर शहरा बाहेर, अडवळणीस आसलेल्या या सुंदर ईमारतीची दुरावस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोनपेठ तालुक्यात एकुण ६५ गांवे आहेत. तालुक्यातील आजारी रुग्णांच्या उपचारासाठी सोनपेठ शहरात एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर शेळगांव, वडगांव, गवळी पिंपरी, डिघोळ (ई), शिर्शी बु, लासीना, कानेगांव, खडका, नरवाडी, आवलगाव, ऊखळी (बु,), धामोनी आदी तालुक्यातील विविध गांवामध्ये बारा उपकेंद्र आहेत. या ठिकाणी सामान्य रुग्नांना प्राथमिक उपचार मिळतो तर गंभीर रुग्नांना मात्र आपल्या उपचारासाठी परळी, अंबेजोगाई व परभणी सारख्या ठिकाणी जावे लागले. सोनपेठ तालुक्यातील सर्व प्रकारच्या आजारी रुग्नांसाठी तालुक्याच्या ठिकाणी एक ग्रामीण रुग्नालय व्हावे या मागणीसाठी येथील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरीकांनी आनेकवेळा शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवीले. आनेक अंदोलने व सततच्या पाठपुराव्यामूळे येथील जनतेची मागणी पुर्ण करुन शासनाने सोनपेठ तालुक्यासाठी शहराच्या ठिकाणी एक ग्रामीण रुग्नालय मंजुर केले. यासाठी तब्बल तीन कोटी सत्तर लाख रुपयेे खर्च करुन एक भव्य ईमारत तयार झाली. मात्य गेली दोन महिन्यांपासून रूग्नालयाची इमारत आजही उदघाटनाच्या प्रतिक्षेत उभी आहे. आता येथील नागरीकांना प्रतिक्षा लागलीय ती नव्या ईमारतीमध्ये ग्रामीण रुग्नालय सुरु होण्याची. सर्व सोईनी परिपूर्ण तयार झालेल्या ईमारतीमध्ये प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन तेथे नविन पदनियुक्ती करुन ग्रामीण रुग्नालय सुरु करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें