नदिम तांबोळी.प्रतिनिधी.पाथरी.
पाथरी माजलगाव महामार्गावर दि.24 सकाळी पहाटे चार वाजता हर्षेवर्धन फिलिंग स्टेशन पेट्रोलपंपा समोर उभा असलेल्या बोरवेलच्या गाडीला समोरून आयशरने धडक धडकल्याने आयशर मधील एक महिलेला गोकर्णा आश्रोबा चव्हाण (27) डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला हे आयशर ऊसतोड मजूर घेऊन जात होते
परंतु वाटेतच काळाने घाला घातला या अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे .
सदरील घटना चालकाला डोळा लागल्याने घडली असल्याची सांगितले जाते आयशर मधील समोर बसलेले सर्व एकाच कुटुंबातील होते ते गंभीरपणे जखमी झाले गंगाराम शंकर चव्हाण (40) बबिता चव्हाण (35) धीरज चव्हाण (13)वरील सर्व गंभीर जखमी झाले आहेत ते हिंगोली जिल्हातील सेनगाव तालुक्यातील कचरेवाडी येथील आहेत शांताबाई जाधव जिंतूर तालुक्यातील गडदगव्हान येथील आहेत पाथरी पोलीसांनी चालक रविंद्र पांडूरंग यास ताब्यात घेऊन जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें