बदनापुर शहरात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 10 अक्टूबर 2018

बदनापुर शहरात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव.


बदनापुर शहरातील खासगी दवाखाने हाउसफुल..
शहरासह तालुक्यातील मागिल दोन महिन्या पासुन तापाची साथ पसरल्याने योग्य ऊपाचारा अभावी काही नागरिकांना डेंगू. आणी मलेरिया च्या आजाराने ग्रासले आहे. तर गावातील स्वच्छता मोहीम थांबल्याने पसरलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मलेरिया डेंगू तापाची साथ पसरली आहे.
नागरिकांना शासकीय रुग्णालया मध्ये उपचार करण्यासाठी सोई उपलब्ध देण्यात आल्या आहेत.
परंतु काही रुग्ण ताप आल्यावर आधी शहरातील खासगी डॉक्टरा कडुन प्रथमोउपचार करीत आहे.
त्यामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
अनेक ठिकाणी शहरात पसरलेल्या घाणीमुळे व साचलेल्या डबक्यातील पाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक पातळीवर नगरपंचायत. व ग्रामपंचायत ने स्वच्छता मोहीमेला गती देण्याची गरज आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढु नाही या साठी औषधांची फवारणी आवश्यक आहे.
परंतु प्रशासकीय स्तरावर पुढाकार घेण्यात नगरपंचायत व ग्रामपंचायत मागे पडत असल्याचे दिसून येत आहे.
    आरोग्य विभागाने नागरीकांना तत्परतेने उपचारासाठी पथक तयार करुन सेवा देण्याची गरज आहे.
    तसेच अस्वचछते मुळे डासांची होणारी वाढ नष्ट करण्यासाठी. स्वच्छता जागरण मोहिम सुरू करावी व तापाची साथ पसरु नये यासाठी नागरिकांना आरोग्य विभागाने उपाय सुचवण्यासाठी मागणी होत आहे.




"खाजगी दवाखाने हाउसफुल"
          बदनापुर शहरातील खासगी दवाखाने ताप,घसांचे आजार,खोकला,मलेरिया,पांढरी पेशी कमी होणे,टाईफट, 'काविळ,अशा विविध आजारासाह डेंगू सारख्या आजाराने ञस्त झाले आहेत. परंतु बदनापुर शहरात आजाराचे योग्य निदान होत नाही,तोपर्यंत खासगी डॉक्टरा रुग्णाचे नातेवाईक सांगतात किवा रुग्ण सांगतो म्हणून उपचार करतात व नंतर रूग्ण अत्यवस्थ झाला की जालना किंवा औरगाबाद येथे खाजगी दवाखान्यात पाठवतात. तोपर्यंत रूगणाची  तब्बेत जास्त होऊन तो दगावतो ही.. थोडक्यात बदनापुर येथील खासगी डॉक्टर हे सदरील रूगणा कडुन किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून आर्थिक लुट करून घेत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें