युवकांचे संघटनशक्तीतून काँग्रेस पक्षाला बळकटी - नगराध्यक्ष अब्दुल समीर; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 10 अक्टूबर 2018

युवकांचे संघटनशक्तीतून काँग्रेस पक्षाला बळकटी - नगराध्यक्ष अब्दुल समीर;

गाव तिथं युवक काँग्रेस पक्षाची शाखा स्थापणार ;काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात युवक काँग्रेसची मासिक बैठक संपन्न;

सिल्लोड (प्रतिनिधी) दि 09
युवक काँग्रेसच्या संघटनशक्तीतून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी वाडी - वस्ती - तांड्यासह ग्रामीण भागात युवक काँग्रेसच्या शाखा स्थापन करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असुन युवक काँग्रेसच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुकांच्या कामासाठी आतापासूनच जोमाने कामाला लागावे असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.

सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात युवक काँग्रेसची मासिक बैठक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशसचिव रुपेश जैस्वाल,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील तायडे,धरमसिंग चव्हाण,ताई राजरत्न निकम,भगवान नाईक,अमित कळम,वसिम देशमुख,सुभाष जाधव,अब्दुल बासित,आदिंसह युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांनी उपस्थित पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांना पक्षाचे ध्येय - धोरणे समजावून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी राजकुमार भोटकर,संजय मुरकुटे,अकिल देशमुख,गुलाबराव मिरगे, मतीन देशमुख,अमित आरके,मनोहर आरके,गणेश राजपूत,राधेश्याम अग्रवाल,स्वप्निल आमटे, मच्छिंद्र दांडगे,सचिन साळवे, इमरान कुरैशी,राम निकम,विशाल साळवे,उमेश देहाडे,सागर सपकाळ,संदीप दुधे,रवि दुधे, फईम पठाण, रवि आरके,जगन्नाथ कुदळ,आदिंसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुञसंचालन युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव वसिम देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवक काँग्रेसचे तालुका महासचिव सुभाष जाधव यांनी व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें