केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे वतीने सिल्लोड शहर कडकडीत बंद ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 10 सितंबर 2018

केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे वतीने सिल्लोड शहर कडकडीत बंद ;


पेट्रोल - डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सामान्य जनता हतबल -- नगराध्यक्ष अब्दुल समीर;

औरंगाबाद बिडबायपास जवळील मस्के पेट्रोल पंपाजवळ आंदोलन करताना कॉग्रेस कार्यकर्ते व सामान्य नागरीक.


सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.१०) -- केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या नेतृत्वाखालील सरकारने निवडणुकीच्या वेळी सामान्य जनतेसह व्यापारी - लघु उद्योजक - युवक - महिला शेतकरी - शेतमजुरांसह कामगारांना दिलेल्या आश्वासनांची कुठलीही पुर्तता केलेली नाही, उलट या शासनाने जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढण्यास कारणीभूत असलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढच करीत असल्याना सामान्य नागरिक हतबल होत असल्याचे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले.
पेट्रोल व डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे वतीने भारत बंदची हाक देऊन सिल्लोड शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. नगराध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यासह बाजारपेठेतील व्यापारी - सराफा मार्केट मध्ये काँग्रेस पक्ष - पदाधिकारी- कार्यकर्ते - नागरिकांनी रॅली काढून भाजप सरकारविरोधी घोषणा देऊन व्यापा-यांना सिल्लोड शहर कडकडीत बंदचे आवाहन करून विनंती केली. व्यापाऱ्यांनी सिल्लोड शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळून आपली दुकाने बंद ठेवून काँग्रेसच्या आवाहनाला साथ देऊन बंद पाळण्यात आले.
भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी " सबका साथ सबका विकास " अशी वल्गना करून जुमलेबाजी भाजप सरकारने नोटाबंदीसह जाचक जीएसटी लागू करुन नागरिकांसह व्यापा-यांना आर्थिक अडचणीत आणले आहे. दोन कोटी रोजगार उपलब्ध करु हे आश्वासनही हवेत विरले आहे. महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत असुन घटनेची पायमल्ली करुन समाजात अराजकता निर्माण केली जात आहे. समाजविघातक शक्तींकडून निषेधार्थ कृत्य केली जात असतांना सरकार त्यांना पाठीशी घालीत आहे.
देशात महागाई व झुंडशाही अराजकता माजवत असुन अप्रिय घटनांनी शिखर गाठला आहे. या सरकारच्या काळात समाजातील लोकशाही व धर्मनिरपेक्षता तथा सर्वधर्मसमभाव या नितीमुल्यांना मानणारा कुठलाही घटक सुरक्षित राहिला नसून संकटात सापडला आहे. भाजपच्या नेतृत्वातील जबाबदार प्रतिनिधी आमदार राम कदम सारखे मर्जीच्या विरोधात युवतींना उचलून नेण्याची भाषा करीत आहे. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांमध्ये कर्जबाजारीपणामुळे वाढच होत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे सामान्य जनता भरडली जात असुन या सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे नेतृत्वाखाली २१ पक्षांच्या पाठिंब्याने पुकारण्यात आलेल्या भारत बंद मध्ये सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांनी सहभाग नोंदवित कडकडीत बंद पाळण्यात आला.
शेतकरी - शेतमजुर - युवक - युवती - व्यापारी - कामगार - तसेच महिलांसह सामान्य जनतेला तातडीने दिलासा मिळाला पाहिजे अशी मागणी या बंदच्या माध्यमातून करण्यात आली.यावेळी वरिल विषयाला अनुसरून नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्याकडे नगराध्यक्ष अब्दुल समीर , जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, तालुका अध्यक्ष देविदास पाटील लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शांतीलाल अग्रवाल, प्रा.मन्सूर कादरी, नंदकिशोर सहारे, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड , विक्रांत दौड,
माजी उपनगराध्यक्ष - शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, सलिम हुसैन, नगरसेवक रऊफ बागवान रईस मुजावर पठाण, राजरत्न निकम, सत्तार हुसैन, सुनिल दुधे, कैसर आझाद, राजु गौर, लड्डू पटेल, शेख बाबर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दामोधर गव्हाणे , हनिफ मुल्तानी, पंजाबराव चव्हाण, पंडितराव गोडसे, विविध सोसायटी चेअरमन राजेंद्र बन्सोड, मोबिन पठाण, हाजी मोहम्मद हनिफ, लक्ष्मण तायडे, अमित आरके, मनोज कोठळे,  मियाभाई, चंदू बोर्डे, अजिज भाई , विश्वनाथराव गायकवाड, संजय मुरकुटे, विनोद कोठाळे, मुश्ताक बापु देशमुख, गणेश डकले, सुखदेव जिवरग, आप्पा पाटील तायडे, कुणाल सहारे, मतीन देशमुख, रविंद्र राजपूत , अकिल देशमुख, लक्ष्मण कल्याणकर, राजेश्वर आरके ,अशोक पांढरे, राजु साठे, जमीर मुल्तानी, एकनाथ शिंदे, भावराव दुधे, सखाराम अहिरे, रवि आरके, जगन्नाथ कुदळ, अमोल कुदळ, फईम पठाण, धम्मपाल दांडगे, तौसिफ पठाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें