कु.अनुराधा शेळके व काजल राठोड यांचा जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने यांच्या हस्ते जाहीर सत्कार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 1 सितंबर 2018

कु.अनुराधा शेळके व काजल राठोड यांचा जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने यांच्या हस्ते जाहीर सत्कार.



"आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवरील माझा विश्वास अधिक दृढ झाला”- राजेंद्र काका लहाने जिल्हा परिषद सदस्य वालूर.


 सेलू प्रतिनिधी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वालूर येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून रमेश धापसे शा.व्य.समिती अद्यक्ष वालुर, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र काका लहाने होते. त्याचप्रमाणे याप्रसंगी  पारडी येथील सरपंच माउली राठोड ,मुख्याध्यापक पार्डी मैफळ सर ,रामेश्वर पाथरकर, महादेव टेकाळे, केंद्र मुख्याध्यापक चौधरीसर,माजी पंचायत समिती  उपसभापती गणेश राव मुंडे, दिगंबर रोकडे बालाजी हळकर, मुकुंद मुंडे मुंजाजी चव्हाण व केंद्रप्रमुख लगड सर आदी उपस्थित होते.
        *शिक्षण परिषदेअंतर्गत विध्यार्थ्यांना प्रेरीत करण्यासाठी, त्यांनी मिळवलेल्या यशाचा कौतुक करण्यासाठी. विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यामध्ये राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांची शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी यांचा प्रथम मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे तालुकास्तरीय सीआरजी कार्यशाळेत उत्कृष्ट मुलाखत घेतल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी येथील विद्यार्थिनी कुमारी अनुराधा दिगंबर शेळके व कुमारी काजल रामेश्वर राठोड या दोन विद्यार्थिनींचा परिषद सदस्य राजेंद्र काका लहाने व मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.*
          *याप्रसंगी राजेंद्र काका लहाने म्हणाले, “कुमारी राधा व काजल या विद्यार्थिनींची मुलाखत ऐकल्यानंतर मला माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवरील विश्वास अधिक दृढ होत आहे. ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली ते पाहता त्या उद्याच्या यशाच्या नांदीआहेत.याच पद्धतीने तुम्ही आपल्या या सादरीकरणामध्ये सातत्य ठेवा, उद्याच्या यशाची शिखरे तुमची वाट पाहत आहेत."असं आव्हानही त्यांनी याप्रसंगी केलं. या दोन्ही विद्यार्थिनीच्या भविष्यासाठी त्यांनी भरभरून शुभेच्छाही दिल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी येथील  मुख्याध्यापकांचा व सर्व शिक्षकांचा जाहीर अभिनंदन केलं*
           केंद्रातील सर्व शिक्षकांनी आपापल्या शाळेत मन लावून काम करावं मी तुमच्या सर्वांसोबत आहे. तुमच्या सर्व अडीअडचणी मध्ये मी सहकार्य करेल, पण सर्वजण मिळून आपल्या केंद्राचा गुणवत्तेचा  आलेख वाढू या. असे आवाहनही त्यांनी सर्व शिक्षकांना याप्रसंगी केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज माने व आभार प्रदर्शन किरण गिल्डा यांनी केलं.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें