महाराष्ट्रातील एमआईएम पक्षाची हैदराबाद येथे दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न। - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 5 सितंबर 2018

महाराष्ट्रातील एमआईएम पक्षाची हैदराबाद येथे दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न।


कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।

औरंगाबाद : गटतट, आरोप-प्रत्यारोप आणि गैरवर्तनामुळे पक्षाच्या बदनामीला कारणीभूत ठरलेल्या काही नगरसेवकांमुळे राज्यभरातील 112 नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचे आज हैदराबादेत आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांनी प्रबोधन केले. एमआयएम पक्षाचा इतिहास सांगतांनाच " नियत साफ रखो, कामयाबी तुम्हारे कदम चुमेंगी, नियत खराब रखोगे तो तुम्हारे नसीबमे रुसवाईया आऐगी' असा सल्ला देखील त्यांनी दिला.
एमआयएमच्या महाराष्ट्रातील सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसाठी हैदराबादेत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आज (ता.4) या सर्वांना अकबरोद्दीन ओवेसी यांनी मार्गदर्शन केले. एमआयएमची स्थापना, त्यानंतर आमच्या कुटुंबावर झालेले अन्याय, अत्याचार, कुठल्या परिस्थीतीत पक्ष वाढवला हा सगळा इतिहास सांगितल्यावर पक्षाला जे यश आज मिळाले आहे त्यामागे ओवेसी कुटुंबाने तीस वर्ष घेतलेले कष्ट, भोगलेला तुरुगांवास असल्याचे अकबरोद्दीन यांनी सांगितले.
एमआयएमच्या स्थापनेनंतर हा पक्ष बंद करा यासाठी माजी पंतप्रधान पंडीत जवाहरालाल नेहरू यांनी आमच्या वडलांवर प्रचंड दबाव आणला, अनेक महिने त्यांना तुरूंगात डांबले पण त्यांनी जुमानले नाही आणि आज एमआयएम भक्कमपणे पाय रोवून उभी आहे. राजकारण करण्यासाठी या पक्षाची स्थापना केली नव्हती. मुस्लिम समाजातील गोर-गरीबांना चांगले आरोग्य, शिक्षण मिळावे, त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठीच एमआएमची स्थापना करण्यात आली होती आणि ते काम आम्ही हैदराबादेत चांगल्या प्रकारे करतो आहोत.
हेच काम महाराष्ट्रात आणि देशाच्या इतर भागात आपल्याला करायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आधी पक्ष, त्याची ध्येय धोरण याचा विचार करावा. पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही याची जाणीव ठेवली तर तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही असा विश्‍वास ओवेसी यांनी उपस्थितांना दिला.
रुग्णालये, महाविद्यालये उभारली
हैदराबादमध्ये मजलीसने दोन सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, आयटी, इंजनिअरिंग, वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. आसरा आणि ओवेसी हॉस्पीटलमध्ये दररोज पाच हजाराहून अधिक गरीब रूग्ण केवळ दहा रुपयांत तीन महिने उपचार घेतात. बायपास सारख्या शस्त्रक्रिया इथे अत्यंत कमी दरात केल्या जातात असा दावा देखील अकबरोद्दीन ओवेसी यांनी केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें