सेलूत चोरी गेलेली बैलजोडी पोलीसांनी केली शेतक-याच्या स्वाधीन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 10 सितंबर 2018

सेलूत चोरी गेलेली बैलजोडी पोलीसांनी केली शेतक-याच्या स्वाधीन.



◾पोळा सणाला बैलजोडी मिळल्याने शेतकऱ्यांला अश्रू झाले अनावर.  


सेलू !प्रतिनिधी शमशेर खान.

सेलू तालुक्यातील म्हाळासापुर  परिसरात असलेल्या एका शेतातील आखाड्या वरून ४ सप्टेंबर रोजी बैलजोडी चोरीला गेल्याची घटना घडली होती. चोरीला गेलेली हि बैलजोडी शेतक-यानी तक्रार दिल्या नंतर अवघ्या चार दिवसात पोलीसांनी तपास करून शेतक-यांस  पोळासना पुर्वीच खांदेमळनीच्या दिवशी शेतक-याच्या स्वाधीन केल्यामुळे शेतक-यास झालेल्या  आनंदामुळे आश्रु अनावर झाले. याबाबतची माहिती याप्रमाणे तालुक्यातील माळसापुर परिसरात माऊली जिनिंगच्या पाठीमागे   बैल मुंजा या मंदिराजवळ  प्रकाश अशोकराव धुमाळ  यांचे   शेतातून  ४ सप्टेंबर च्या मध्यरात्री पांढ-या रंगाची  बैलजोडी चोरीला गेली होती.  याबाबत त्यांनी     सेलू पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. यापुर्वी देखील म्हळसापुर  परिसरातून  बैलजोड्या  चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या.  बैलजोडी चोरीची तक्रार येताच  सेलू पोलिसांची   तपास यंत्रणा कामाला लागली.  सेलू पोलीस ठाण्यात गुरनं  २०४\१८  या   प्रकाश अशोक धुमाळ यांच्या फिर्यादी गुन्हा दाखल करण्यात आला   पोलिस निरीक्षक संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख मुजीब, हनुमान नाईक, बाळू कदम, विलासराव सातपुते, रंजीत आगळे, संजय साळवे, सुनील वासलवाड यांच्या पथकाने  ८ सप्टेंबर रोजी आरोपी  भारत साहेबराव लांडगे रा.दाडेगाव ता.अबंड , रंजीत संजयराव सोळंके रा. म्हाळसापुर, भाऊसाहेब शिवाजीराव जाधव रा. म्हाळसापुर  या  तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा कबूल करून मुख्य आरोपी भारत साहेबराव लांडगे रा.दाडेगाव तालुका अंबड येथून बैलजोडी ताब्यात घेऊन शेतकरी प्रकाश अशोकराव धुमाळ यांच्या स्वाधीन करण्यात आली.   या घटनेत पोलीसांनी पकडलेल्या तीन आरोपींना रविवार दि. ९ सप्टेंबर र रोजी न्यायालयात हाजर केले असता तीघांनाही न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीआहे. शेतक-याच्या तक्रारी नंतर अवघ्या चार दिवसात तपास करून बैलजोडी पोलीसांनी खादेमळनीच्या दिवशीच  शेतकरी अशोक धुमाळ याच्या स्वाधीन केल्यामुळे पोळा सन आनंदाने साजरा करून पोलीसांना धन्यवाद दिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें