३३ के.व्ही उपकेंद्राचे भूमिपूजन आ. विजयराव भांबळे यांच्या हस्ते . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 1 सितंबर 2018

३३ के.व्ही उपकेंद्राचे भूमिपूजन आ. विजयराव भांबळे यांच्या हस्ते .



सेलू प्रतिनिधी

सेलू तालुक्यातील   ढेंगळी पिंपळगाव येथे ३३ के.व्ही उपकेंद्राचे उद्घाटन शुक्रवारी आ.विजय भांबळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जिप सदस्य राजेंद्र लहाने, पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम पावडे, तालुका अध्यक्ष माऊली ताठे, अॅड.बालासाहेब रोडगे, जिप सदस्य रामराव उबाळे, तालुका कार्याध्यक्ष सुधाकर रोकडे,चंद्रकांत गाडेकर,कल्याण जोगदंड नामदेव महाराज ताठे, तुकाराम ताजे, राजाभाऊ थिटे, तेजस सोळंके, केशव सोळंके, प्रभाकर सोळंके, मारुती सोळंके, राजेभाऊ सोळंके, रमेश मगर, शेख अकबर, बालासाहेब सोळंके, उपविभागीय कार्यकारी अभियंता प्रल्हाद कोरे, अभियंता बळीराम माने,दिपक कुपटेकर, गुत्तेदार ईदंर कदम आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार विजय भांबळे म्हणाले कि,
 सरकारी दरबारी पाठपुरावा केल्यामुळे सेलू तालुक्यात तीन 33 केव्ही उपकेंद्र मंजूर करूण आपले असून यामुळे चांगली दाबाची विज मिळण्यास मदत होईल. शेतीच्या विहिरीला पाणी आहे परंतु विज नाही यामुळे शेतक-यांची मोठी अडचण होत असे यासाठी ३३ केव्ही मंजूर करणे गरजेचे होते.
सेलू तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी कोटेशन भरले परंतु त्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळाले नाही अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी अधिवेशनात प्रश्‍न मांडला त्यामुळे आता शेतक-यांना विज कनेक्शन सह चांगली विज मिळणार आहे.
 त्याबरोबर माझ्या मतदारसंघासाठी नवीन डीपीचा कोटा मंजूर करूण घेतला असून सततच्या पाठपुरावा केल्यामुळे सेलू तालुक्यात तीन ३३ केव्ही उपकेंद्र मंजूर केले.नवीन कोटेशन भरणाऱ्या दोन शेतकऱ्यांना स्वतंत्र डिपी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तो निर्णय लवकरच आमलात येईल.
 आपल्या मतदारसंघासाठी मी 25 कोटी रुपये मंजूर करून घेतले असून त्यामध्ये सेलू तालुका साठी ११कोटी व जिंतूर तालुक्यात साठी १४ कोटी मंजूर केले जास्तीचा निधी देण्यासाठी सरकारला भाग पाडले असून, सेलू जिंतूर मतदारसंघासाठी सर्वात जास्त निधी मंजूर करून आणला जरी सरकार आपले नाही तरीही आपण महावितरणचे कामे खेचून आणले असून यामुळे शेतकऱ्यांना चांगली विज मिळण्यास मदत होईल असे आ. विजय भांबळे म्हणाले....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें