महिला व युवकांची लक्षणिय उपस्थिती होती.
पेट्रोल व डिझेलसह जीवणावश्यक वस्तूचे भाव वाढल्याने सामान्य नागरिक हतबल : राजभाऊ देशमुख.
भोकरदन (जालना) : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सोमवारी (ता. 10) भारत बंदची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरात रॅली काढून बंद पाळण्यात आला. या रॅलीमध्ये अखिल भारतीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, म.न.से., शेतकरी संघटना, समता संघटना, सामाजिक संघटना व सम विचारी पक्ष सहभागी झाले होते.देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. वारंवार होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.वाढत्या महागाईमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे या विरोधात सोमवारी देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून,सोमवारी भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन विरोधी पक्षाच्या वतीने रॅली काढण्यात आली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सदरील रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,महाराणा प्रताप चौक, महात्मा फुले चौक,रोकडा हनुमान मार्गे सराफा मार्केट व मुख्य बाजारपेठ नवीन भोकरदन आदी भागातून रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे युवा नेते सुधाकर दानवे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष त्रिंबकराव पाबळे, राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष रमेश सपकाळ,उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, कॉंग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष राहुल देशमुख, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष नंदकुमार गिर्हे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नईम कादरी,यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांना निवेदन देण्यात आला. छावा संघटनेचे विष्णू गाढे, सुखदेव सिरसाठ, कॉंग्रेस सेवादलचे तालुका अध्यक्ष दादाराव भोंबे, शेतकरी संघटनेचे काकाराव साबळे, म.न.से.चे. विजय चिंचपूरे, समता परिषदेचे विलास शिंदे, महिला कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव सौ.अंजना बारोकर, तालुका अध्यक्षा सौ.विद्या वाघ, शहर अध्यक्षा सौ.संगीता फुसे, चंद्रकलाबाई साळवे, जयश्री बोरसे, किरणदेवी जहागीड, बबनराव देशमुख, पंचायत समिती सदस्य रमेश बरडे, रामदास रोडे, जुमान चाऊस, कॉंग्रेसचे गटनेते संतोष अन्नदाते, राष्ट्रवादीचे गटनेते प्राध्यापक रणवीरसिंह देशमुख, नगरसेवक नसीम पठाण, नगरसेवक कदिर बापू, दिपक तळेकर, शेख रिजवान भाई, शेख जाफर भाई, विजय इंगळे, रमेश जाधव, अझर शाह, माजी नगर सेवक चंद्रकांत पगारे, अनिल देशपांडे, शेख राफिकोद्दिन, महेश औटी, शेख नजीर, मंगेश जाधव, शेख रऊफ, सलीमखा पठाण, साळूबा लोखंडे, प्रताप शिंदे, जयंत जोशी, शेख रईस, विष्णू भालेराव, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते हजार होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें