सिल्लोड (संतोष लहाने )दि 09
सिल्लोड - सोयगाव मतदारसंघात सध्यातरी
राजकारणातल्या "ओसाड " पाऊलखुणाच अनुभवायला मिळत आहे .
मतदारसंघातील राजकारण सध्यातरी दिवसेंदिवस तापत असतांनाच राजकीय पटलावरील एक चर्चेचं
गु-हाळच ऐकायला मिळत आहे.राजकीय गप्पांना नेहमीच ऊत येत आहे. पक्षाशी बांधिलकी असलेला सामान्य कार्यकर्ताही पुढील निवडणुकांच्या डावपेचातील आलेख आखतांना दिसतो आहे.
एकंदरीतच आ. अब्दुल सत्तार यांच्या मागील (2014 मधील) निवडणूकीचा
" बिगूल " वाजण्यातील नाट्यमय वळणाचं राजकीय मंथन करण्याचा प्रयत्न केला असता " मोदी " लाटेतही आपली पकड मजबूत करुन जनतेची मने जिंकलेली आहे.
मोदी लाटेचं राजकीय वादळ हळूहळू ओसरत असल्याचे चित्र समोर येत असल्याने 2019 मध्ये पार पडणा-या विधानसभा निवडणुकीत आ.अब्दुल सत्तार यांची राजकीय पकड मजबूत असल्याचेच चित्र सध्या तरी सिल्लोड - सोयगाव मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातील भाजपच्या राजकीय गोटात सध्यातरी शांतता पसरली असल्याचे पाहायला मिळत असले तरी भाजपच्या राजकीय फडात
" ठगणराव पाटील भागवत " वादळात " सुनिल पाटील मिरकर " यांची अधिकची भर पडली असली तरी भाजप मधील आपले वजन टिकवून ठेवण्यात "सुरेश पाटील बनकर " यांना भाजपची उमेदवारी मिळविण्यात यश येईल ? असेच काहीसे वातावरण तग धरुन आहे. सुरेश पाटील बनकर हे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या निकटवर्तीय गोटातून हॅट्रीक चान्स उमेदवारी मिळविण्यात कमी पडणार नसल्याचेच चित्र सध्या तरी राजकीय वातावरणात उभारी देत आहे .
तर दुस-या गोटात सर्वसामान्यांची मोट बांधून भवन रणांगण गाजवणारी भाजप तालुकाअध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे - इद्रीस मुल्तानी जोडी नंबर वन च्या शोधात
" अभी नहीं तो कभीं नही " या राजकीय सुञात हळूवारपणे मजल मारतांना चर्चेच्या
" गु-हाळाला " खतपाणी घालण्याचेच काम करीत आहे.
भाजप तालुकाअध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात घालून ज्ञानेश्वर पाटील मोटे यांनी इद्रीस मुल्तानी यांच्या मध्यस्थीने भाजपच्या गोटात
" राजकीय पोटसूळ " उभा ठाकण्याचे काम सुरु केल्याची चर्चाही अधून मधून रंगत आहे.
एकच वादा फक्तच " दादा " वर केंद्रीत या राजकीय वलयातील मंडळींना आमदारकीचे एकप्रकारे डोहाळेच लागलेले असले तरी सध्यातरी भाजप गोटात शांततामय वातावरण असुन अधूनमधून
" ठगणराव पाटील भागवत " वादळात " सुनिल पाटील मिरकर " वादळाची भर पडत असल्याने ग्रामीण भागात राजकीय " डफाचा " आवाज गोंगावत " आम्ही गोंधळी - गोंधळी अंबामातेचे गोंधळी , आमची व्हावी आता पुकार नसता आम्ही पुन्हा " जय भवानी - जय शिवाजी " गाजवणार....! अशीच चर्चा ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळात एकप्रकारचं खतपाणी घालण्याचे काम करीत असल्याचेच नाकारता येत नाही...!
तर दुसरीकडे हळूवारपणे आपली आगेकूच करीत माजी आ.सांडु पाटील लोखंडे यांनी आपल्यातील " सच्चा " पाटील जागवून
" संघाच्या " माध्यमातून नव " संजीवनी " मिळविण्यासाठी संघाचा " डोंगर " पोखरण्यास सुरुवात केली असल्याची चर्चाही दमदारपणे समोर येत आहे. पण
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी पुन्हा एकदा सर्वांची एकजूट घडवून आणली असुन आ.अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राजकीय आगडोंब ओतून आमदारकीचे डोहाळे लागलेल्या सर्वांनाचq कामाला लावले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .
अपना - अपना गड फत्ते करीत एकच वादा पुन्हा
" दादा " चा पत्ता टिकवून ठेवण्यासाठी " पाटलांचा नांदच खुळा " या नव्या जोमाने रावसाहेब पाटील दानवे यांचे "राजकीय दानशुर " पुन्हा एकदा कामाला लागले असल्याचेच चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे... असेच काहीसे म्हणायला हरकत नाही !
" हॅट्रीक चान्स....."
"भाई - भाई होते है....? दोस्तों का मेला " तुफान " बन रहा है , इतना भी मत सोच मेरे दोस्त.... अभी तो " अर्जुन बाण आ रहा हैं और किसान के लिए " बच्चू कडू " की ललकार पुकार रही हैं....! में तो सीधा - साधा हूं....कल कीं सोच और आज का नजर - अंदाज रखता हूं....! कल का मेला भी पसंद था....आज का मेला भी पसंद हैं....! इंतजार हैं बस्स अब दोस्तों के " तुफान " का ? अशाच प्रकारच्या नजरअंदाजातून आ.अब्दुल सत्तार यांनी आपल्या राजकीय तालमीत हवा भरण्याचे काम सुरु केले असल्याचे नाकारता येत नाही.
चौकट...(मध्यभागी)
उद्याची एक राजकीय पहाट.....!
आ.अब्दुल सत्तार यांच्या राजकीय तालमीत खुलणारे एक नेतृत्व ..... आपल्या राजकीय कारकीर्दीची आगेकूच करणारे तसेच नवतरूणांसोबतच्या मनमिळाऊ स्वभावात रुळणारे..... एक कणखर वक्तृत्वाची तालीम नवतरूणांच्या मनात भिनविणारे...... उद्याची एक राजकीय पहाट उजळविणारे राजकीय वादळ नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या रुपाने सिल्लोड तालुक्यातील जनतेतून एक - एक पाऊल पुढे सरसावत आपली राजकीय आगेकूच करतांना दिसत आहे.
आ.अब्दुल सत्तार यांनी आपल्या राजकीय तालमीत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांना घडविण्याचे काम सुरु केले आहे.
आ.अब्दुल सत्तार यांच्या राजकीय तालमीत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी नगराध्यक्ष पदाची सुञे हळूवारपणे बजावत असतांना सिल्लोड शहरांतर्गत गोरगरिबांच्या विविध विकास योजनांतर्गत कामांमधून आपला दांडगा राजकीय जनसंपर्क वाढविण्याचे काम सुरु करुन युवक काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हाभरातून युवकांची एक राजकीय फळी घडविण्याचे काम करीत आपला जनसंपर्क वाढवून राजकीय समीकरणांत आगेकूच केली आहे . (चौकट पुर्ण)
तर दुसरीकडे आ.अब्दुल सत्तार तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी एकमेकांची जिरविण्याची भाषा अनेक महिन्यांपासून सुरु केल्याने सिल्लोड मतदारसंघातील " राजकीय गु-हाळ " चांगलेच गाजत आहे.एकमेकांविरोधात राजकीय षडयंत्र सुरु केले असल्याची चर्चा सुरु आहे .
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे हे लोकसभेची धांदल ओळखून आ.अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राजकीय आगडोंब ओतून आमदारकीचे डोहाळे लागलेल्या सर्वांनाच एकजुटीचं दर्शन घडविण्याचे आवाहन करीत आहे. तर आ.अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या रुपात खा.दानवे यांना शह देण्यासाठी " मैदान ए जंग "ची भाषाशैली गाजविण्यास सुरुवात केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें