सिल्लोड प्रतिनिधी:दि.९
ग्रामीण भागाबरोबरच शहरातही बैल-जोडीची ठिकठिकाणाहून मिरवणूक काढण्यात आली मराठमोळ्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला. कायमस्वरूपी शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या बैल जोडी सर्जा राजा. पोळा हा एकमेव सण साजरा केला जातो. रविवारी सकाळपासूनच ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पोळ्याची तयारी सूरू केली होती. जनावरे धुऊन मोठ्या उत्साहात बैल जोड्या रंगवण्यात आल्या होत्या. दिवसभर जनावरांच्या मिरवणूका काढून सायंकाळी रुढी परंपरेने बैलांचे लग्न लावून हा सण साजरा करण्यात आला
बैल पोळा सण
अगदी उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी शेतात आपल्याबरोबरच राबणाऱ्या बैलांसाठी खास दिवस असतो. पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें