शिर्डी लोकसभा मतदार संघ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लढविणार ,अण्णासाहेब कटारे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 11 सितंबर 2018

शिर्डी लोकसभा मतदार संघ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लढविणार ,अण्णासाहेब कटारे.


शिर्डी(प्रतिनिधी):राजेंद्र दुनबळे

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची शिर्डी लोकसभा मतदार संघातील नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच येथील शासकीय विश्रामगृहावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर बैठकीतच शिर्डी लोकसभा मतदार संघ हा अनु जाती साठी राखीव असल्याने व मतदार संघात
बौद्ध आंबेडकरी मागासवर्गीय,ओ.बी.सी घटकांची निर्णायक ताकद आहे.
संसदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रतिनिधी जाणे गरजेचे आहे आतापर्यंत जे जे उमेदवार निवडून गेले त्यांच्या कडून मतदार संघात कुठलीही भरीव कामगिरी केल्याचे दृष्टीस येत नाही म्हणूनच खऱ्या अर्थाने उपेक्षित वंचित घटकांचा प्रतिनिधी आगामी निवडणुकीतून संसदेत जाणे महत्वाचे असल्याचेही अण्णासाहेब कटारे यांनी बैठकीत मांडले.
 देशात,राज्यात सध्या जे असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/काँग्रेस पक्ष यांना आपला प्रस्ताव (मागणीनामा)सादर करून देशात व राज्यात घोंगवणारे जातीय सांप्रदायिकतेचे वादळ परतावून लावायचे असेल तर सर्वच धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन भाजपाचे हे केंद्रातील व राज्यातील सरकारचा पाडाव करण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी उभी करून निवडणूका लढवाव्या असा प्रस्ताव राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने ह्या दोन्ही पक्षांना दिला असून जागा वाटपात शिर्डी लोकसभा मतदार संघावर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष दावा करणार असल्याचेही अण्णासाहेब कटारे यांनी बोलतांना सांगितले.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची शिर्डी मतदार संघात उत्तम कामगिरी असून मतदार संघात सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे* त्यामुळे निवडणूक जिंकणे सहज सोपे होईल असेही कटारे यांनी सांगितले.
सदर बैठकीत
केंद्रीय सरचिटणीस पोपटराव सोनवणे,राष्ट्रीय महासचिव अशोक भाई बागुल,राज्य सचिव संजय जी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख तात्या बाबा जगताप,अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनिल जी जगताप,कोपरगाव तालुकाध्यक्ष विकास जगताप,श्रीरामपूर तालुकाध्यक्ष देविदास पंडित,सुनील उगले,नितीन बनसोडे,दत्तू घोडेराव,शकील तांबोळी,मयूर रिक,मंगेश जगताप,नानभाऊ खरात,संजय मांजरे,प्रवीण जगताप,साहेबराव निकाळे,विकास जगताप,संतोष उगले,दिलीप सदाशिव,राहुल निकाळे
तसेच राहता,शिर्डी,संगमनेर,श्रीरामपूर,कोपरगाव,अकोले,नेवासा,लोणी प्रवारा
येथील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें