सोयी - सुविधा उपलब्ध करुन देण्यात नगरपरिषद तत्पर - नगराध्यक्ष अब्दुल समीर.
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 12गणपती उत्सव पूर्वतयारी संदर्भात नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी तातडीची बैठक बोलावून सिल्लोड शहरातील गणेश मंडळ परिसरातील सोयी - सुविधांसंदर्भात चर्चा करीत अधिका-यांना तात्काळ सोयी - सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आदेशीत करण्यात आले.
सिल्लोड शहरासह ग्रामीण भागात गणपती उत्सवात एक सामाजिक सलोखा जोपासत विविध सामाजिक - सांस्कृतिक उपक्रम - कार्यक्रम राबवित गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सिल्लोड शहरातील गणेश महासंघ मंडळासह इतर गणेश मंडळांच्या वतीने अनेक सामाजिक - सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन शहरातील नागरिकांना सामाजिक सलोख्यासह सामाजिक - सांस्कृतिकतेचं दर्शन घडविण्याचे काम केले जाते.
सिल्लोड शहरातील गणपती उत्सव पूर्वतयारी संदर्भात विविध विकास योजनांचा आढावा घेण्याबरोबरच गणपती मंडळ परिसरातील स्वच्छतेसंदर्भात तसेच एलईडी लाईटची व्यवस्थेसह - रस्त्यांसह परिसरातील खड्डे डागडूजी कच भरण्यासंदर्भात नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक कायंदे यांच्यासह संबंधित अधिका-यांशी चर्चा करीत गणपती उत्सव पूर्वतयारी संदर्भात विविध सोयीसुविधा पुरविण्यासाठी नगरपरिषद अधिका-यांना तत्पर आदेशीत केले.
गणपती उत्सव पूर्वतयारी संदर्भात नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालयात बैठक संपन्न झाली यावेळी उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,नंदकिशोर सहारे, विठ्ठलराव सपकाळ,रईस मुजावर पठाण,राजु गौर,राजरत्न निकम, संजय मुरकुटे, मधुकरराव बेंडाळे,कुणाल सहारे,गणेश डकले,मतीन देशमुख, तौसिफ पठाण,फईम पठाण,यांच्यासह नगरपरिषद अधिकारी - कर्मचा-यांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें