बदनापूर (प्रतिनिधी)
जिल्हास्तरीय निवड समितीने निवड केलेल्या जिल्ह्यातील 17 शिक्षकांना "आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे .त्यात प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील प्रत्येकी आठ तर एका कला शिक्षकाचा समावेश आहे.14 सप्टेंबर रोजी एका विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
उत्कृष्ट शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा शिक्षक पुरस्कार योजने अंतर्गत दिनांक 5 सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यासाठी जिल्हास्तरीय निवड समितीने निवड केलेल्या शिक्षकांची यादी मंजूरी साठी विभागीय आयुक्त कार्यालयास सादर केली होती. यात बदनापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा सगरवाडी येथील शिवाजी रामभाऊ लेंढे यांना प्राथमिक शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आणि बदनापूर तालुक्यातील जि. प.प्रशाला बदनापूर येथील शेख राजा शेख कासीम यांना माध्यमिक आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे या बद्दल त्यांचे शिक्षक वृद व बदनापूर शहरातील नागरिकांनी अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें