सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.१७ ) -
सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) स्वच्छता हिच सेवा २०१८ या उपक्रमाची सुरुवात माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आली. शुभारंभ प्रसंगी सिल्लोड नगरपरिषद अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या स्तुत्य उपक्रमात सर्व नागरिक , विविध सामाजिक संघटना,बचत गट,शाळा,महाविद्यालय , व्यापारी वर्ग या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या शहराला स्वच्छ शहर करुया असे आवाहन यावेळी उपस्थित नागरिकांना करण्यात आले.
सोमवार (दि.१७ )रोजी स्वच्छता मोहीम व श्रमदान या उपक्रमाची सुरुवात प्रियदर्शनी चौक पासुन संपुर्ण सिल्लोड शहरात राबविण्यात आली .
मंगळवार (दि.१९ )रोजी शालेय विद्यार्थ्यांची स्वच्छता प्रभातफेरी सकाळी १० वाजता शहरातील डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते संपुर्ण शहरातून काढण्यात येणार आहे. सिल्लोड शहरातील इयत्ता वर्ग ८ वी ते १२ वी चे संपुर्ण विद्यार्थी या उपक्रमात सहभाग नोंदविणार आहे. तर गुरुवार (दि.२७) रोजी स्वच्छता शपथ व स्वच्छता दौड या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १० वाजता शहरातील प्रियदर्शनी चौक येथे करण्यात आले आहे.
सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)स्वच्छता हिच सेवा २०१८ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मोहीमेचा शुभारंभ आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे,शांतीलाल अग्रवाल, शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ,रऊफ बागवान, लड्डू पटेल, सलिम हुसैन, संजय आरके, हाजी मोबिन पटेल, इसाकभाई, शेख बाबर बागवान, संजय मुरकुटे, सत्तार हुसैन, कैसर आझाद, मनोज कोठाळे, मधुकरराव बेंडाळे, हाजी मोहम्मद हनिफ,गणेश डकले, अकिल देशमुख,मतीन देशमुख,सखाराम अहिरे, जगन्नाथ कुदळ, रावसाहेब सिरसाठ,जितु आरके, भावराव दुधे, फईम पठाण, रवि आरके यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी - कर्मचा-यांसह काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें