उपक्रमशील शिक्षक योगेश ढवारे यांना टोंगा देशाचा मोस्ट आयडीयल इनोव्हेटिव टिचर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 18 सितंबर 2018

उपक्रमशील शिक्षक योगेश ढवारे यांना टोंगा देशाचा मोस्ट आयडीयल इनोव्हेटिव टिचर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.


सेलू प्रतिनिधि

येथील सेलू तालुक्यातील श्री.के.बा विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक व कवी योगेश ढवारे यांना टोंगा देशाचा *मोस्ट आयडीयल इनोव्हेटिव्ह टिचर* हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.पुढील महिन्यात ३० तारखेला समारंभ पूर्वक मुंबई येथील हाॅटेल इन या पंचतारांकित हाॅटेल मध्ये शानदार पुरस्कार सोहळा टोंगा देशाचे शिक्षण मंत्री व राजदूत या मान्यवराच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

पुरस्कार निवड समिती चे भारत देशातील प्रमुख राकेश मित्तल यांनी भारतातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १० उपक्रमशील शिक्षकांची प्रस्ताव तथा पीपीटी द्वारे निवड केली असुन यात महाराष्ट्रातुन योगेश ढवारे यांना पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.

सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच आनंददायी व कृतियुक्त  शिक्षण देण्याचा मानस असलेले योगेश ढवारे यांनी स्वनिर्मित कविता निर्मिती,आनंददायी पाढ्यांच्या भेंड्या,कलेतून उपस्थिती वाढीकडे,शनिवारची दुपारची शाळा,सर्वरोग निदान शिबीर, शब्दबॅक,पुस्तकभिशी,वर्गमंत्रिमंडळ,फिरते वाचनालय,शिक्षकांसाठी विभागीय कथाकथन स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा  असे अभिनव व सामाजिक तसेच विद्यार्थीप्रिय उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत आहेत.
 
 ढवारे यांना आधीही यावर्षीच मुंबई येथील वनिता फाउंडेशन चा राज्यस्तरीय शैक्षणिक क्रांतीरत्न तसेच राजवैद्य फाऊंडेशन महाराष्ट्र चा उपक्रमशील शैक्षणिक रत्न हा पुरस्कार प्राप्त झाला आहे  व यवतमाळ येथील यूनेस्को संचलित संस्थेचा विश्वशांतीदूत पुरस्कार देखील जाहीर झाला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी आशाताई  गरूड,उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे,सेलू पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जयंत गाढे आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें