हिंगोली : या जगात कुणालाही चमत्कार करता येत नाही,या नावाखाली हातचलाखी अन प्रयोग केले जातात, जो जो चमत्कार करतो तो तो बदमाश असतो असे खणखणीत प्रतिपादन अंनिसच्या महिला संपर्क प्रमुख डॉ.स्वप्ना लांडे यांनी आज येथे केले.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हिंगोली जिल्हा शाखेने आयोजित केलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात डॉ.लांडे बोलत होत्या.चमत्कार, बुवाबाजी,साक्षात्कार,जादूटोणा या विषयावर त्यांनी मार्गदर्शन करून जादूटोणा विरोधी कायदा समजावून सांगितला.
प्रारंभी प्रदेश प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे यांनी अनिसची भूमिका समजावून सांगून समाजात धर्माच्या नावावर लोकांचे मेंदू गुलाम करणारे पंथ वाढले असल्याचा इशारा दिला,दुपारच्या सत्रात विदर्भ संपर्क प्रमुख अशोक घाटे यांनी चमत्कार प्रात्यक्षिके दाखवून भूत,भानामती,मंत्र तंत्र अंगात येणे यावर सविस्तर मार्गदर्शन केले,यावेळी नेहरू महिला केंद्राच्या अध्यक्षा नाझीया खान ,जिल्हा संघटक प्रकाश मगरे उपस्थित होते. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत चाललेल्या या शिबिरात 50 प्राधिक्षणार्थी उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें