विवेकानंद विद्यालयात बाल साहित्य प्रदर्शन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 4 अगस्त 2018

विवेकानंद विद्यालयात बाल साहित्य प्रदर्शन.


सेलू / प्रतिनिधी
येथील विवेकानंद प्राथमिक विद्यालयात दि.३१ जुलै ते १ऑगस्ट या दोन दिवसासाठी बाल साहित्य प्रदर्शन भरविण्यात आले.सेवानिवृत्त शिक्षक श्री. पु. ना. बारडकर यांनी पुढाकार घेतला.त्यांनी विविध साहित्य प्रकार व बडबड गीते म्हणुन दाखवली . पुस्तकांची ओळख करून दिली.
इयत्ता १ली ते ९ वी च्या विध्यार्थ्यांना विविध पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घाटन मु.अ. श्री.बळवंत देशमुख यांनी केले.या उपक्रमामुळे विध्यार्थ्यांत  वाचन संस्कृती वाढीस लागण्यास मदत झाली.
उपक्रम यशस्वीतेसाठी विजय चौधरी , शंकर राऊत ,श्रीपाद जोशी, विनोद मंडलिक ,चेतन नाईक, सतीश भुजबळ यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें