सांगलीत गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 2 अगस्त 2018

सांगलीत गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार.


वि.प्रतिनिधी.समशेर खान.
सांगली जिल्ह्यातल्या तुरची गावात एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुकुंद माने, जावेद खान, विनोद आणि सागर यांच्या सहित एकूण आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या पतीला गाडीत डांबून या महिलेवर या आठ जणांनी अत्याचार केले.काही महिन्यांपूर्वी या दाम्पत्याने हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी त्यांना विवाहित जोडप हवं होतं त्याच्या ते शोधातहोते. काही ग्राहकांकडे याबाबत त्यांनी विचारणा देखील केली होती. मंगळवारी रात्री संशयित मुकुंद माने याने पीडित महिलेच्या पतीशी मोबाईलवर संपर्क साधून तसं जोडपं मिळाल्याची माहिती दिली. त्यांना भेटण्यासाठी संशयित आरोपीने दोघांना तुरची फाट्यावर बोलवलं. त्यानंतर दोघा दाम्पत्यांना मारहाण करुन महिले एका खोलीत नेऊन महिलेवर बलात्कार केला. महिला 8 महिन्यांची गर्भवती होती.पीडित महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची सोनसाखळी आणि वीस हजारांची रोकड घेऊन हे आरोपी फरार झाले. दोघांना आरोपींनी दमदाटी देखील केली. पोलिसात तक्रार न करण्याची धमकी देखील दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें