सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२६ऑगस्ट २०१८
तालुक्यातील डिघोळ येथील अल्पवयिन पिडीत मुली सोबत प्रेमसंबध ठेवून नराधमाने दोन वर्ष बलात्कार केल्याची फिर्याद पिडीतेच्या आईने दिली असून यावरून सोनपेठ पोलिस ठाण्यात आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डिघोळ येथील एका अल्पवयीन मुली सोबत दोन वर्षांपासून गावातीलच मुंजा मुंगे (१९ वर्ष) याने प्रेमसंबध ठेऊन बलात्कार केला असून, या संबंधातून गर्भवती झालेल्या सदरील पिडीत मुलीने १५ दिवसापुर्वी एका मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर आरोपी मुंजा मुंगे याने पिडीतेला पंढरपूर येथे पळवून नेल्याची तक्रार पिडीतेची आईने दिली असून यावरून मुंजा मुंगे यांच्या विरूध्द बलात्कारासह बाल लैंगीक अत्याचाराचा गुन्हा २३ ऑगस्ट रोजी राञी उशीरा सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सपोनी अमोल पवार हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें