सोनपेठ (राजेश खेडकर) दि. ३०जुलै २०१८
येथे सुरू असलेल्या अंतर शालेय पावसाळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिजामाता स्कूल सोनपेठ येथे झालेल्या मुलांच्या कब्बड्डी स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील अंतिम सामन्यात विजयी होऊन जि. प. प्रशाला सोनपेठचा संघ जिल्हा स्तरावर खेळण्यास पात्र ठरला आहे. विजयी संघाचे तहसिलदार जिवराज डापकर, गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण, शाळेचे मुख्याध्यापक तथा तालुका क्रीडा संयोजक सुमित लांडे, शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष उषाताई कडतन, शिक्षण तज्ञ तथा जयभवानी मित्र मंडळ सोनपेठ चे संस्थापक अध्यक्ष बळीराम काटे आदींनी अभिनंदन केले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक रविकुमार स्वामी, ज्येष्ठ शिक्षक धिवार, सुधाकर कदम, गोरवे, संदिप लष्करे, सज्जनसेटी, सावंत, श्रीमती रोडे, श्रीमती राठोड, भोसले, शेख आदींची उपस्थिती होती. यावेळी जय भवानी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बळीराम काटे यांनी आपल्या मंडळा तर्फे कब्बड्डी साठी लागणारी किट (ड्रेसिंग) पुरविण्याचे आश्वासन दिले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें