सराटी येथील बौद्ध कुटूंबांची शेतीमशागतीसाठी पाच - सहा किलोमीटरची पायपीट ;
सिल्लोड (प्रतिनिधी) दि 04सराटी गावच्या शिवरस्ते - पाणंद रस्त्यांवर आजुबाजुच्या शेतक-यांनी अतिक्रमण केले असुन येथील शेतकरी - शेतमजुरांना शेती मशागतीसाठी खुपच हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. अशातच येथील बौद्ध कुटूंबांस आपल्या शेतात शेतीमशागत करण्यासाठी पाच - सहा किलोमीटर अंतरावरुन बोदवड गावातून पायपीट करीत जावे लागत आहे.
सराटी - बोदवड - पिंपळदरी - बाळापुर गाव - परिसरातील शिवरस्ते - पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे असा प्रश्न आ.अब्दुल सत्तार यांनी विधान सभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला होता. या तारांकित प्रश्नाने सिल्लोड तहसिल प्रशासन खडबडून जागे झाले खरे पण अद्यापही सराटी - बोदवड - पिंपळदरी - बाळापुर शिवरस्ते - पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात
अधिका-यांकडून एकप्रकारे दिरंगाईच केल्या जात आहे. बळीराजा रस्त्यांची चातकाप्रमाणे प्रतिक्षाच करीत आहे.तर अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळेच सराटी - बोदवड परिसरातील शिवरस्ते - पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात अधिका-यांकडून दिरंगाई करण्यात येत असल्याने या गावांतील शेतकरी - शेतमजुरांना शेती मशागती कामांसाठी खुपच हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे.
सराटी - बोदवड - पिंपळदरी - बाळापुर गाव परिसरातील शिवरस्ते - पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात यावे नसता संबंधित प्रशासकीय अधिकारी - कर्मचा-यांना जबाबदार धरीत संबंधित
अधिका-यांविरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशाराही परिसरातील शेतकरी - शेतमजुरांमधून करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें