आंबेनळी घाटातून सर्व मृतदेह काढले बाहेर, शोधकार्य थांबवलं. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 जुलाई 2018

आंबेनळी घाटातून सर्व मृतदेह काढले बाहेर, शोधकार्य थांबवलं.





*महाबळेश्वर/पोलादपूर :- पिकनिकसाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस आंबेनळी घाटातील तब्बल आठशे फूट खोल दरीत कोसळून 33 जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृतदेह घाटातून बाहेर काढण्यात आल्यानंतर बचाव पथकानं शोधकार्य थांबवले आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, ट्रेकर्स आणि ग्रामस्थांच्या मदतीनं शोधकार्य राबवण्यात आले.*

*दरम्यान, खिडकीतून बाहेर फेकले गेल्याने वाचलेले सहाय्यक अधिक्षक प्रकाश देसाई सावंत यांनी दरीतून वर येऊन माहिती दिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात आली. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत कर्मचारी दापोली व चिपळूण तसेच वेंगुर्ले कणकवली (सिंधुदुर्ग) तालुक्यात राहणारे आहेत. त्या भागांत शोककळा पसरली आहे.*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें