मोरेगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड साहित्यसह एक लाख ७६ हजार जप्त. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 24 जुलाई 2018

मोरेगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड साहित्यसह एक लाख ७६ हजार जप्त.



सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील जुगार अड्ड्यावर परभणी येथील पोलीस पथकाने धाड टाकून जुगार साहित्य सह ते ३३ जणांना ताब्यात घेऊन तब्बल १ लख ७६ हजार रुपये जप्त केल्याची खळबळजनक घटना 23 जुलै रोजी दुपारी ५ :४०  च्या सुमारास घडली मोरगाव येथे जुगार सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्वास पानसरे यांना मिळाली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी उस्मान शेख पोउपनि शिशिरकुमार कुमार देशमुख व सोबत सात पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने मोरेगाव येथे पांदण रस्त्यावर एक बंद खोलीत जुगार खेळणाऱ्या ३३ जनांना ताब्यात घेतले त्यांच्या जवळील साहित्यसह १ लख ७६ हजार रक्कम जप्त केली या ३३ आरोपींना सेलू पोलिस ठाण्यात आणून रात्री १० वा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रतिक्रिया चालू होती परभणीतील पथकाकडून सर्वात मोठी कारवाई झाल्यामुळे खळबळ उडाली या ३३ आरोपी मध्ये नामांकित व्यक्तीचा समावेश असल्याने या कारवाई ला महत्व आले आहे आषाढी एकादशीच्या दिवशी जुगार अड्ड्यावर सर्वात मोठी धाड पडल्याने सेलु शहरातील अवैध धंदे दारू मटका जुगार अड्डे जोरात चालू असून अवैध    धंद्यावर आता पोलीस कारवाई करतील का नाही अशी चर्चा सेलु येथील नागरिकात चर्चा जोरात सुरू आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें