प्रतिनिधी.शिर्डी.
13 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेसाठी सावळी विहीर येथील जी,प शाळेत वृक्ष दिंडी काढून वृक्ष लावण्यात आले,शासनाच्या या उपक्रमाचे राज्यात मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले ,जी प शाळेत
सावळी विहिरीचे सरपंच सो,रुपालीताईआगलावे,उपसरपंच वृषालीताई जपे ,राहता पंचायत समिती सदस्य ओमेश जपे ,केलास सदाफळ,ग्रामसेवक रमेश सोमवंशी,अनिल वाघमारे सारिका वाघमारे,संतोष आगलावे,बबन आरणें, शिक्षक दत्ता गायकवाड ,मुख्याध्यापक दहिफळे,ग्रामस्थ ,विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्तीत होते या प्रसंगी ओमेश जपे म्हणलेकी
 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत करण्यात येणा-या 13 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम यशस्वी करण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न आहे यात
लोकसहभागाचे काम महत्वाचे आहेच तसेच झाडे लावून त्याची निगा ,व,काळजी घेणे महत्वाचे आहे,,झाडांचे उपयोग व निसर्गाचा समतोल कसा राखता येईल याची माहिती या प्रसंगी ओमेश जपे यांनी दिली सरपंच,व उपसरपंच यांनी वृक्ष लावण्याचा सल्ला देऊन त्याचे जतन करण्यास सांगितले आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते झाडे लावण्यात आले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें