असा माझा मांग गारुडी समाज - सचिन उपाध्ये. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 जुलाई 2018

असा माझा मांग गारुडी समाज - सचिन उपाध्ये.



 अश्वी (प्रतिनिधी) :

मांग गारुडी समाजाची अवस्था आज बिकट आहे. गावोगावी भटकून कुटूंबाचे पोषण करताना वास्तव्याचा ठोस पुरावा नाही. शिक्षणाचा अभावामुळे दाखला नाही. मुख्य प्रवाहात येऊन स्थिरावू इच्छीत आहे. मांग गारुडी समाजातील मुले, मुली शिक्षण घेण्यासाठी जात प्रमाणपत्र मिळत नाही.

समाजातील लोकांना १९५२ पूर्वीचा पूर्वजांचा दाखल देणे शक्य नसल्याने त्यांना जात प्रमाणपत्र शासनाकडून देण्यास टाळले जात आहे. यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळू शकत नाही. हे प्रमाणपत्र मिळावे म्हणून अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे.

गावात गेले तर घर नाही, रानात आले तर हातभर जमीन नाही. अशा स्थितीत त्यांनी वास्तव्याचा पुरावा आणावा तरी कुठून अशी स्थिती या समाजाची झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे लोटले तरीही या समाजाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व अन्य संवैधानिक गरजांपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र शासनाने केले आहेत.

शासनाच्या विकासात्मक धोरणापासून दूर आहेत. राजकीय इच्छाशक्तीअभावी या समाजाची प्रगती होऊ शकली नाही.समाज्यातील अनेक लोक अडाणी असल्याने बेरोजगार आहेत.समाज्यातील काही लोक म्हशी भादरुन खातात तर काही भिक्षा(भीक) मागून खातात, कोणी कान साफ करतय , कोणी हमाली करतय तर कोणी धूणभांडी अश्या दारिद्रित जीवन जगुनही कोणाला दारिद्र्य रेषेखालचे कार्ड नाहीं तर काहिंना रेशनकार्ड नाहीं. दारिद्र्य रेषेखालचे कार्ड नसल्याने सरकारच्या अनेक सुविधांचा लाभ घेता येत नाहीं. अडाणी व  बेरोजगार असल्याने समाज्यातील तरुण व्यसनाधीन झाले आहेत. अनेकांचे व्यसानाने बळी ही घेतले आहेत.

हया सर्व प्रस्थितित जे शिकले ते बेरोजगार आहेत. सरकार आमच्याकड़े कधी लक्ष देणार असा प्रश्न समाजापुढे पडला आहे.

समाज्यातील लोकांना राहण्यास घर नाहीं, रेशनकार्ड नाहीं, जातीचे दाखले नाहीं, दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव नाहीं, काही काम नाहीं अश्या अनेक समस्या आहेत. या परिस्थितित समाज्यातील लोकांनी जगावे कसे ? असा प्रश्न समाजापुढे पडतोय.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें