देवळगाव गात येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी लावले कुलूप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 जुलाई 2018

देवळगाव गात येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी लावले कुलूप.


नेहमीच डॉक्टर अनुपस्थित असल्याकारणाने रुग्ण व गावकरांनी केला संताप व्यक्त.



सेलू प्रतिनिधी
तालुक्यातील देवळगाव गात येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 3 जुलै मंगळवार रोजी दुपारी बारा वाजता येथील वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्या कारणाने सभोवतालच्या गावातील रुग्ण व देवळगाव गात येथील ग्रामस्थ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावले रुग्णालयातील डॉक्टरांच्या विरोधात संताप व्यक्त केला प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे रुग्णांची नेहमीच हेळसांड होते या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर शिपाई यांची सह चार पदे रिक्त आहेत यामुळे हे पद भरण्याकडे अद्यापही कोणाचे लक्ष नाही असाही गावकऱ्यांनी यावेळी संताप व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे गोपाळ कदम शेलार सतीश बाबासाहेब गायकवाड सुरेश कदम अण्णा पावडे शिवराम कदम गोरख शेलार परमेश्वर गायकवाड विठ्ठल गायकवाड सुशील कदम शिवा कणसे आधीची यावेळी उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें