मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर याआंदोलनाचा वणवा परभणीतही पसरल्याचे गेल्या दोन दिवसात दिसून आले. गुरुवार दि. १९ आणि आज शुक्रवारीही या आंदोलनकर्त्यांनी तब्बल १० बसेस फोडल्या असून यामध्ये एस.टी. महामंडळाचे सुमारे पावणेचार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती विभाग नियंत्रक जे.एन. सिरसाट यांनी दै. सामनाशी बोलताना दिली.
दरम्यान, गुरुवारी पालम आणि सोनपेठ येथे एकूण ६ बसेस तर शुक्रवारी चार बसेस फोडल्या. यामध्ये नांदेड-गंगाखेड (एम.एच.२० बी.एल.१६९५) पालम जवळील केरवाडी येथे, गंगाखेड-लोहा (एम.एच.२० एस. ८७६१) पालम जवळील केरवाडी, लातूर-परभणी (एम.एच.२० बी.एल.३६११) सोनपेठ जवळ, परभणी-नांदेड (एम.एच.२० बी.एल. ३७०७) अर्धापूर जवळ, सोलापूर-हिंगोली (एम.एच.१४ बी.टी.३०३६) बोरवंड जवळ, पंढरपूर-गंगाखेड (एम.एच.१४ बी.टी.००९५) धर्मापूरी जवळ तर शुक्रवारी हिंगोली परभणी (एम.एच.२० बी.एल.२३१८), परभणी-वसमत (एम.एच.१४ बी.टी.१३६३) शहरातील शिवाजी काँलेज जवळ, कळमनूरी-परभणी (एम.एच.२० बी.९९३१) शहरातील शिवाजी कॉलेज जवळ तर परभणी-जिंतूर (एम.एच.२० बी.एल.०६२१) विसावा कॉर्नर जवळ ही बस फोडण्यात आली. दरम्यान नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंर्त्यांनी येणाऱ्या नौकरीच्या जागांमध्ये १६ टक्के आरक्षण जाहीर केले असले तरी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरु असून शासनाने ठोस लेखी आश्वासन द्यावे,अशी मागणीही परळीसह परभणीतही मराठा समाजाचेतरूण करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें