Airtel India - स्प्रेडींग हेट्रेड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 21 जून 2018

Airtel India - स्प्रेडींग हेट्रेड.

Airtel India - स्प्रेडींग हेट्रेड.

इन्फोर्मेशन टेक्नोलॉजीच्या यशामुळे आज सारे जग एक 'ग्लोबल विलेज' बनले आहे. सोशल मीडियामुळे तर या ग्लोबल विलेजच्या रहिवास्यांना कोणताही मुद्द्यावर काहीबाही बरगळण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. या व्यक्त होण्याचे जितके फायदे आहेत तितकेच नुकसानदेखील समोर येत आहेत. एखाद्या विशिष्ठ दिशेत लाकांचे मन वळविण्यासाठी सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. सोशल मिडीयाचा वापर करून एखाद्या विशिष्ठ जनसमूहाच्या विरोधात जनभावना भडकाविल्या जात आहेत. समाजात द्वेषाची पेरणी करणे, विष कालवणे सहज सोपे झाले आहे.
कालचीच घटना पहा. एका धर्मांध तरुणीने तिच्या ट्विटर हँडलवर मुस्लिम कर्मचाऱ्याशी बोलणार नाही असे एअरटेलला सांगितल्यावर एअरटेलने चक्क 'हिंदू' कर्मचारी पुरवला. कार्यकर्तीच्या या घवघवीत यशामुळे काही क्षणातच तिच्या फॉल्लोवरची संख्या १० हजारापेक्षा जास्त झाली. म्हणजे देशात हिंदू युवकांचे किती मोठ्या प्रमाणात 'ब्रेनवॉश' केले गेले आहे हे समजते. तसेच ती तरुणी कोणत्या धर्मांध संघटनेसाठी कार्य करते हे माहित असल्याने तिच्याबद्दल बोलून काहीच हशील नाही.
आपण बोलूयात एअरटेल बद्दल. एका माथेफिरूच्या विकृत मागणीला एअरटेलने थाराच कशी दिली? एक व्यावसायिक कंपनी या नात्याने एअरटेलने केवळ 'व्यवसाय' करणे अपेक्षित आहे. विकृत मागणी मान्य करून एअरटेलने धर्मांधाना खतपाणी घालण्याचे काम केले आहे. आज मुस्लिम कर्मचारीशी आम्ही बोलणार नाही, असे सांगितले जात आहे. तर उद्या कंपनीत मुस्लिम कर्मचारी असताच कामा नये अशीही मागणी होऊ शकते. मग काय त्या मागणीही मान्य केली जाणार काय? एअरटेलचे हे कृत्य जातीयतेला, भेदभावाला खतपाणी घालणारे आहे. एअरटेलच्या या कृत्यामुळे धर्मांधांना खतपाणी मिळाले आहे.
जर हीच परिस्थिती चालू राहिली तर तो दिवस लांब नव्हे कि ज्या दिवशी कस्टमर केअरला फोन लावल्यावर आपल्या असे ऐकू येईल. ब्रह्मणाशी संवाद साधण्यासाठी १ दाबा, हिंदुत्ववादी असाल तर २ दाबा, मुस्लिमविरोधी असाल तर ३ दाबा, आपली जात किंवा धर्म उल्लेखित केला गेला नसेल तर ९ दाबा...
मुस्लिम कर्मचाऱ्याशी केलेल्या व्यवहारामुळे एअरटेलला माफी मागणे अपरीहार्य आहे. एअरटेल माफी मागत नाही तोपर्यंत मी तर एअरटेलमधून पोर्ट करतोय. आपल्याला एअरटेलचे वागणे चुकीचे वाटत असेल तर आपणही पोर्ट होणे गरजेचे आहे. आपल्याला चुकीचे वाटून देखील आपण एअरटेल सोबत राहताय तर आपण जाणून बुजून एका समाजविरोधी कृत्याला खतपाणी घालताय, असाच याचा अर्थ घ्यावा लागेल.
निदान आम्ही जिवंत आहोत, हे दाखविण्यासाठी तरी एअरटेलचा त्याग करणे अपरिहार्य आहे.
सौजन्य Shaikh Tazeem Husain यांच्या पोस्टमध्ये काही फेरबदलांसह

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें