समशान भूमीतील शेडमध्ये खड्डे.
सेलू प्रतिनिधी.सेलू शहरातील हिंदू समशान भूमी असलेल्या शेडमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत मृतदेहांवर अंत्यविधी त्यानंतर राख सावरणे सावडणे व इतर विधि पार पाडण्यास अडचणी येत आहेत शेडमध्ये खड्डे पडल्याने बहुतांश मृतदेहावर शेड बाहेर अत्यसंस्कार केले जात आहे सध्या पावसाळा सुरू झाल्याने मृतदेहावर शेड मध्ये अत्यसंस्कार केले जातात अत्यसंस्कार झाल्यानंतर राख सहा सावडणे व इतर धार्मिक विधि पार पाडल्या जातात या विधि पार पाडण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे शेड मधील खड्डे बुजवावेत अशी मागणी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे निवेदनावर रघुनाथ बागाल अशोक राव खताळ भाऊसाहेब सोनवणे वाल्मीक खुळे बाळासाहेब काष्टे प्रमोद खारकर विष्णू बागल कपिल पडुळ नागनाथ भुमरे नथुराम अंभूरे किरण मिसाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें