वालुर येथील जि.प.प्राथमिक शाळा(ऊर्दु) येथील रिक्त पदे न भरल्यास शाळेला कुलुप ठोकण्याचा ईशारा.
महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान संघटनेच्या वतिने मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी निवेदन.
प्रतिनिधी.वालुर.दि.07/06/2018.
सेलु तालुक्यातील वालुर या गावात जि.प.प्रा.शाळा (ऊर्दु) माध्यम हि 1 ली ते 8 वी पर्यंत असुन या ठिकानी विद्यार्थी संख्या हि भरपुर असताना देखील येथे शिक्षकाची संख्या हि अपुरी आहे.
गेल्या आठवड्यात अॉनलाईन शिक्षाची बदली झालेली असताना या ठिकानि एका हि शिक्षकाची नियुक्ती न करता उलट या शाळेतील 4 शिक्षकाची बदली इतरत्र ठिकानी झालेली आहे.या शाळेला 10 शिक्षकाची मान्यता असतांना गेल्या वर्षी येथे 6 शिक्षक होते.परंतु आता 4 ची बदली झाल्याने या ठिकानी फक्त 2 शिक्षक शिल्लक राहिलेले आहे.270 विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेतील समानिकरण पध्दतीने येत्या शैक्षणिक वर्ष 18/06/2018. पर्यंत रिक्त पदे भरण्या आली नाहि तर महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठाण या संघटनेच्या वतिने शाळेला कुलुप ठोकण्याचा ईशारा देण्यात आला आहे.निवेदनावर सेलु तालुकाध्यक्ष.अनवर पठान.व वालुर शहर अध्यक्ष आबेद कुरेशी यांच्या सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें