न्यू हायस्कूल भोकरदन शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 जून 2018

न्यू हायस्कूल भोकरदन शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

न्यू हायस्कूल भोकरदन शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

 भोकरदन प्रतिनिधी (शेख सलीम)   शहरातील अतिशय नामांकित शाळा म्हणून नावलौकिक मिळविलेल्या न्यू हायस्कूल शाळेत दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत व NEET परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
यावेळी कु पुजा ज्ञानेश्वर लोखंडे व कु अश्विनी शामराव ठाले या विद्यार्थिनींचा NEET परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे इ. 10 वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी
कु चोपडे निकीता दादाराव 96.20% गुण
कु.पाटील मीनल संभाजी 94.80% कु. लकडे ऋचा सुधीर 94.60% गुण कु. वाघ ऋतुजा सतीश 93.20% कु. राजपूत वैष्णवी भगवान  93.00% मुळे अनिकेत समाधान - 92.60% वसावे विपीन दामोदर- 92.20% राठोड सुनिल पिंटू - 92.20% गावंडे दिपक समाधान - 92.20% कु. गाढे तेजल केशव - 91.40% आसरे योगेश गजानन - 91.20% कु. बारोकर पुजा रामदास - 90.80% शेळके वैभव एकनाथ - 90.60% कु. देहाडराय धनश्री कैलास - 90.60% ढंगारे अजिंक्य राजेंद्र - 90.40% तायडे अविनाश नंदकिशोर -  90.20% या विद्यार्थ्यांचा सत्कार केला
383 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले त्यापैकी 129 विद्यार्थी विशेष प्राविण्य,159 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये 72 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये तर 3 विद्यार्थी तृतीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.
एकुण  363 उत्तीर्ण विद्यार्थी झाले. शाळेचा निकाल 94.77% लागला. यावेळी शालेय समिती उपाध्यक्ष मा नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, मुख्याध्यापक एस.  एस. भालेराव, उद्योगपती महादूसिंग डोभाळ, सामाजिक कार्यकर्ते त्रिंबकराव पाबळे, नगरसेवक नसीम पठाण, लकडे सर, संभाजी पाटील, एकनाथ शेळके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,  विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें