क्युरीअस किड्स उद्घाटन सोहळयाचे आयोजन.गुणवंत विध्यार्थी सत्कार व एरो माँडेलिंग शो.बोलक्या बाहुल्याचा खेळ व जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 जून 2018

क्युरीअस किड्स उद्घाटन सोहळयाचे आयोजन.गुणवंत विध्यार्थी सत्कार व एरो माँडेलिंग शो.बोलक्या बाहुल्याचा खेळ व जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम.

क्युरीअस किड्स उद्घाटन सोहळयाचे आयोजन.गुणवंत विध्यार्थी सत्कार व एरो माँडेलिंग शो.बोलक्या बाहुल्याचा खेळ व जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम.


सेलू:- सँनरो एज्युकेअर प्रा.लि. प्रस्तुत क्युरिअस किड्स प्री-प्रायमरी स्कूलचा उद्घाटन सोहळा, जागतिक योग दिन,गुणवंत विध्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा एरो माँडेलिंग शो व बोलक्या बाहुल्याचा खेळ जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम (ता.२१) जून वार गुरवार रोजी विद्याविहार संकुल रवळगाव रोड येथे सकाळी ठीक ९.०० वा.आयोजित केले आहे. क्युरिअस किड्स प्री-प्रायमरी स्कूलचे उद्घाटन  महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा.ना.बबनरावजी लोणीकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेलू –जिंतूर विधानसभेचे आमदार मा. विजय भांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष  मा.बाबाजानी दुराणी, कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.सुरेश वरपूडकर , मुख्यकार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.,परभणी जि.प.सदस्य रामनाना खराबे व कार्यक्रमाचे अध्यक्ष सँनरो एज्युकेअर प्रा.लि.चे चेअरमन डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
           क्युरिअस किड्स या प्री-प्रायमरी स्कूलमध्ये रोल प्ले अँक्टीव्हीटी, म्युझिक काँर्नर ,बॉल पूल कॉर्नर ,आर्ट अँन्ड क्राफ्ट, रीडिंग कॉर्नर, अँक्टीव्हीटी रूम, क्युरीसीटी कॉर्नर व सँण्ड प्ले एरिया इ. कृतियुक्त विभागातून विध्यार्थ्याचे अध्ययन व अध्यापन केल्या जाते जेणेकरून विध्यार्थ्याना लेखन,वाचन,श्रवण व भाषण या कौशल्याचा विकास होईल या दृष्टीने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.यामधूनच विध्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल विध्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व गोष्टी आत्मसात करून विद्यार्थी शिकेल. या उद्देशाने  डॉ.संजय रोडगे यांनी सेलू तालुक्यातील विद्यार्थ्यासाठी या शाळेची स्थापना केली आहे. त्याच बरोबर सेलू तालुक्यातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्याार्थ्याचा सत्कार मा.ना.बबनराव लोणीकर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ठेवला आहे. सेलू शहरातील शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी मोठ्या विमानाचा थरार अनुभवन्याची  सुवर्ण संधी डॉ.रोडगे यांनी उपलब्ध केली आहे. खास सेलु वासियांकरिता 4 था जागतिक योग दिनाच्या आयोजन क्यरीअस कीड्स व आर्ट आँफ लिव्हीग सेलु परिवार यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे. यासाठी योग प्रशिक्षक भास्कर मगर व किशोर घडे उपस्थित राहणार असुन विद्यााविहारच्या प्रांगनात  तसेच सेलू शहरात विमानाच्या विविध प्रतिकृतीचे प्रदर्शन व उड्डानाचे  प्रात्यक्षिक औरंगाबाद येथील अभिषेक पगारे व संपूर्ण टीम दाखवणार आहे.त्याचप्रमाणे शालेय विद्याार्थ्याचा प्रवेश उत्सवाचे औचित्य साधून बोलक्या बाहुल्याचा खेळ व जादूचे प्रयोगाचे प्रात्यक्षिक प्रसिध्द जादुगार अमित सोळंकी दाखवनार आहेत
        क्युरिअस किड्स प्री-प्रायमरी स्कूलचा उद्घाटन सोहळा, जागतिक योग दिन,गुणवंत विध्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा एरो मौड्लिंग शो व बोलक्या बाहुल्याचा खेळ जादूचे प्रयोग व विविध कार्यक्रमास जास्तीत जास्त विध्यार्थी व सेलुतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान संनरो एज्युकेअर प्रा.लि.चे चेअरमन डॉ.संजय रोडगे  यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें