कल्याणी येथे वृक्ष भेट देऊन पर्यावरण पूरक ईद साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 जून 2018

कल्याणी येथे वृक्ष भेट देऊन पर्यावरण पूरक ईद साजरी.

कल्याणी येथे  वृक्ष भेट देऊन पर्यावरण पूरक ईद साजरी.


 प्रतिनिधी ईमरान खान.

रमजान ईद निम्मित कल्याणी येथील मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांना वृक्ष भेट देऊन पर्यावरणाच्या रक्षण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.
जागतिक स्तरावर उष्णतेत सातत्याने होत असलेली वाढ, हवामान व ऋतुबदल, अवकाळी पाऊस, दुष्काळ तसेच दुर्भिक्ष यावर मात करण्यासाठी व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवत शेख रफिक शेख सत्तार या तरुणाने रमजान ईद चे औचित्य साधुन ईद निम्मित भेटायला येणाऱ्यांना  आंबा,चिंच,पिंपळ,जांभुळ, बदाम आदी १२५ वृक्ष भेट दिले व वृक्ष संगोपनाची शपथ सुद्धा दिली व शिरखुम्याचा आस्वाद सुद्धा या वेळी कल्याणी येथील गावकऱ्यांनी घेतला आणि हा आगळा वेगळा उपक्रम राबल्या बद्दल शेख रफिक याचे कौतुक केले
या प्रसंगी कल्याणी येथील सरपंच सुंदर बाई खंडाळकर,दयालसिंग खंडाळकर, शेख सत्तार भाई,शेख मुन्शी भाई,हरीशचंद्र देवरे,दारासिंग धनावत,शेख रज्जाक भाई, शेख मुख्तार भाई व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें