चंद्रकांत पाटील यांना बर्थडे गिफ्ट; आठवडाभराचे प्रभारी मुख्यमंत्रीपद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 11 जून 2018

चंद्रकांत पाटील यांना बर्थडे गिफ्ट; आठवडाभराचे प्रभारी मुख्यमंत्रीपद.

चंद्रकांत पाटील यांना बर्थडे गिफ्ट; आठवडाभराचे प्रभारी मुख्यमंत्रीपद.

वि.प्रतिनिधी.समशेर खान.
*राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस असून आजच त्यांना एक खास बर्थडे गिफ्ट मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर गेल्याने प्रभारी मुख्यमंत्रीपदाचा पदभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.मुख्यमंत्रीपदासोबतच कृषीमंत्रीपदही चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. 16 जूनपर्यंत चंद्रकांत पाटील यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे असतील.*

*लोकाभिमुख कामे हाच आपला पिंड असून, तळागाळातील आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी सतत धडपड सुरूच राहणार असल्याचे राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजच्या आपल्या वाढदिवसानिमित्त बोलताना सांगितले.*

*दरम्यान,मुख्यमंत्र्यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्याकडील कृषी खात्याची जबाबदारीही चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविली.*

*वाढदिवस हा कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर साजरा करायचा असतो; पण त्यातही समाजाच्या भल्यासाठी काय करता येईल, हे शोधायला हवे, असे ना. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, राजकीय कारकीर्दीत आपण कधीच स्वप्रसिद्धीसाठी खटाटोप केला नाही. वाढदिवसाचे भले मोठे बॅनर लावून शहर, गाव आणि रस्ते विद्रूप करण्यापेक्षा तोच पैसा सामाजिक सोयी-सुविधांसाठी वापरला जावा, हा माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा नेहमीच आग्रह राहिला.*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें