शिर्डी - सिकंद्राबाद एक्सप्रेस मधील प्रवाशी महिलेच्या दागिन्याची चोरी. ◾औरंगाबाद रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 21 जून 2018

शिर्डी - सिकंद्राबाद एक्सप्रेस मधील प्रवाशी महिलेच्या दागिन्याची चोरी. ◾औरंगाबाद रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

शिर्डी - सिकंद्राबाद एक्सप्रेस मधील प्रवाशी महिलेच्या दागिन्याची चोरी.

◾औरंगाबाद रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 

◾ संशयीत आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात ?


सेलू ,प्रतिनिधी


 शिर्डी - सिकंद्राबाद एक्सप्रेस मधील एका प्रवाशी महिलेच्या दागिन्याची जबरी चोरी झाल्याची घटना शनिवार १६ जून रोजी रात्री ११.१० वाजेच्या सुमारास सेलू रेल्वे स्टेशनवर महिलेच्या डब्यात घडल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र लगेच रेल्वे सुरु झाल्याने प्रवाशी महिला भांबाऊन गेली. या प्रकरणी औरंगाबाद रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयीत चोरट्यास ताब्यात घेतल्याचे कळते.


याबाबतची माहिती या प्रमाणे, शिर्डीहून सिकंद्राबादकडे जाणार्‍या शिर्डी - सिकंद्राबाद गाडी क्रं. १७००१ या एक्सप्रेस रेल्वेत महिलेच्या डब्यातुन प्रवास करणार्‍या आनंतलक्ष्मी इडकुल्ला या महिलेच्या अंगावरील सोन्याच्या ६० हजार रुपये किंमतीच्या मंगळसुत्राची अज्ञात इसमाने जबरी चोरी केल्याची घटना शनिवार १६ जून रोजी रात्री ११.१० वाजेच्या सुमारास घडली. या संदर्भात महिलेने नांदेड रेल्वे पोलीस कडे दिलेल्या तक्रारीवरुन औरंगाबादला फॅक्सवरुन करण्यात आलेल्या नोंदीनुसार  १७ जून रोजी १५.५१ मिनिटांनी गुरनं. ४७६/१८ भादंवी ३९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शिर्डी - सिकंद्राबाद रेल्वेत हा प्रकार घडला असून महिलेच्या डब्यात अज्ञात चोरट्याने रेल्वे सेलू स्टेशनवर थांबली असता डब्यात येऊन महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले. तेव्हा रेल्वे नेमकी सुरु झाली होती. या घटनेची फिर्याद आनंतलक्ष्मी इडकुल्ला यांनी दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबाद रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक आनंद बनसोड या घटनेचा तपास करीत असून त्यांनी १९ जून रोजी सेलू येथील काही संशयीत तरुणांना ताब्यात घेतले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें