शहीद औरंगजेबचा भाऊ म्हणतो...म्हणून मला सैन्यात भरती व्हायचं आहे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 17 जून 2018

शहीद औरंगजेबचा भाऊ म्हणतो...म्हणून मला सैन्यात भरती व्हायचं आहे.

शहीद औरंगजेबचा भाऊ म्हणतो...म्हणून मला सैन्यात भरती व्हायचं आहे.

शहीद जवान औरंगजेब यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर जम्मू काश्मीरमधील त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. शहीद औरंगजेब यांच्या मृत्यूबदल्यात आता सरकारकडून त्यांना शंभर दहशतवाद्यांचा खात्मा पाहिजे. याचाच अर्थ दहशतवादाबाबत सरकारकडून ठोस पावलं उचलली गेली पाहिजे. औरंगजेब यांचा भाऊ म्हणतो की, सरकार जर असं करणार नसेल तर आम्हाला माहित आहे त्यांना कसं यमसदनी पाठवायचं, पण आम्हाला वाटतं याबाबत सरकारकडून पहिल्यांदा निर्णय घेतला जावा. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी औरंगजेब यांच्या लहान भावालाही सैन्यात भरती व्हायचं आहे.पत्रकारांशी बोलताना शहीद औरंगजेब यांच्या गावातील नागरिकांनीही शस्त्रसंधीचे उल्लंघन होऊ नये अशी मागणी केली आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने येथील गावांना आणि नागरिकांना जीवाशी दोन हात करून येथे रहावे लागत आहे. नेहमी शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने येथील नागरिकांचा जीव नेहमीच धोक्यात येत आहे. शहीद औरंगजेब अमर रहेच्या घोषणा देत हजारो नागरिक आणि सैन्यातील वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर शहीद जवान औरंगजेब यांच्या वडीलांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, माझा एक मुलगा शहीद झाला आहे तर माझा मोठा मुलगाही सैन्यात कार्यरत आहे.मला याचा मोठा अभिमान आहे आणि देशासाठी आम्ही सर्व कुटुंबिय कुर्बान होण्यास तयार असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने माझ्या मुलाचा बदला घ्यावा अन्यथा त्याचा बदला घेण्यासाठी मी स्वत: तयार असून देशासाठी माझ्या दुसर्या मुलालाही मी सैन्यात दाखल करणार असल्याचे अभिमानाने सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें