ऑनलाईन सातबारा निघत नसल्याने शेतकरयांचे हाल... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 जून 2018

ऑनलाईन सातबारा निघत नसल्याने शेतकरयांचे हाल...

ऑनलाईन सातबारा निघत नसल्याने शेतकरयांचे हाल...

डिजीटल इंडिया फक्त कागदावर.... महा ई सेवा केंद्रावर शुकशुकाट.

मुनाफ पटेल
पैठण ता.२  मागील पंधरा दिवसापासुन ऑनलाईन सात-बारा निघने
बंद असल्याने पैठण तालुक्यातील शेतकरयांचे हाल होत असुन त्यांना शासनाकडुन
मिळणारयाविविध योजनासाठी जमीनीचा सात-बारा असणे आवश्यक असते. माञ
तब्बल पंधरा दिवसापासुन पैठण तालुक्यातील कोणत्याही महा ई सेवा केंद्रावर
शेतीचा ऑनलाईन सातबारा निघत नसल्याने तालुक्यातील शेतकरयांचे शासनाच्या
कृषि विषयक विविध योजंनाच्या लाभापासुन लाभार्थी असुन देखील मुकावे लागत
आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी संताप व्यक्त करीत असुन महा ई सेवा
केंद्रावर ऑनलाईन सातबारे तत्काळ सुरु करावे अशी मागणी करीत आहे.
मागेल त्याला शेततळे, फळबाग योजना, पिककर्ज, सिंचण विहिरी, जमीनीची
खरेदी विक्री, ठिंबक व शेततळे पन्नी अनुदान यासह अनेक योजनासाठी
ऑनलाईन सही सिक्का असलेले सातबारे अवश्यक असते. माञ सही सिक्का
असलेले सातबारे कोणत्याच महा ई सेवा केंद्रावर निघत नसल्याने महा ई सेवा
चालकांना तर शेतकरयांच्या रोषाला सामोरे जावेच लागत आहे शिवाय
शेतकरयांनाही शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासुन मुकावे लागत आहे.
काय म्हणतात शेतकरी....
शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ सातबारयाशिवाय मिळत नाही, त्या
तलाठ्यांनी हस्तलिखित सातबारे देणे बंद केल्याने आता शेतकरयांना ऑनलाईन
सातबारयाशिवाय पर्याय नाही..(संभाजी तवार, कडेठाण)
पंधरा दिवसापासुन ऑनलाईन सातबारयासाठी महा ई सेवा केंद्रावर चकरा मारीत
आहे.माञ आणखीन सातबारा मिळालेला नाही, महा ई सेवा केंद्र चालक म्हणतात
वरुनच बंद आहे. (नारायण पिवळ, आडुळ)
चौकट
गेल्या पंधरा दिवसापासुन सही सिक्केवाले सातबारे महा ऑनलाईन कडुनच बंद
आहे शिवाय चार दिवसापासुन महा ई भुमी चा ही सातबारा आता बंद आहे.
त्यामुळे आम्ही सातबारा देवु शकत नाही..( मनोज कुलकर्णी, तालुका समंवयक )
चौकट
महा ई सेवा केंद्राच्या पोर्टललाच सातबारा नाही तर शेतकरयांना देणार कोठुन
नेमके कशामुळे सातबारे बंद आहे ते देखील महा ऑनलाईन कडुन केंद्र चालकांना
सांगण्यात आलेले नाही. (किशोर शिंदे महा ई सेवा केंद्र चालक , पाचोड )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें