वीर माहेश्वर जंगम बाल संस्कार शिबिराचा समारोप.
जीवनात बाल संस्कार उपयुक्त ठरतात-डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.३१मे २०१८
सोनपेठ येथील श्री नंदिकेश्वर मठ संस्थानात गेली एक महिना वीर माहेश्वर जंगम बाल संस्कार चतुर्थ शिबिराची सांगता काल दि.३०मे २०१८ रोजी करण्यात आली. यावेळी ऊपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिबीरार्थींना प्रशस्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले.
या समारंभास जगद्गुरू श्री श्री श्री १००८ ज्ञानसिहासनाधीश्वर डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी कशीपीठ यांच्या पवित्र सानिध्यात प्रमुख गुरुवर्य श्री १०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, श्री १०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज, श्री १०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख सचिव श्री वैद्यनाथ मंदिर देवस्थान परळी, पाहुणे जीवराज डापकर, बाबुराव मेनकुदळे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. स्वागत गीत जान्हवी विलास शेटे लातूरकर हिने गायले. जगद्गुरूंचे स्वागत श्री श्री श्री १०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी केले तर सर्व मान्यवरांना जगद्गुरुनी आशिर्वाद दिले. तर उपस्थित पत्रकार बांधवांचे शब्द सुमनानी स्वागत करण्यात आले. प्रथम शिबिरार्थी प्रतिनिधी प्रथमेश उमेश स्वामी बीड यांनी आपले अनुभव कथन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. संतोष रणखांब यांनी व्यक्त केले, मनोगत काशिनाथ शिवाचार्य महाराज, अमृतेश्वर शिवाचार्य महाराज, राजेश्वर देशमुख आदींनी व्यक्त करून जगद्गुरू यांच्या शुभ-हस्ते सर्व ४३ शिबिरार्थ्यांना प्रशस्ती पत्राचे वाटप करून जगद्गुरू श्री.श्री.श्री. १००८ ज्ञानसिहासनाधीश्वर डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी कशीपीठ यांनी उपस्थितांना वीर माहेश्वर जंगम बाल संस्कार शिबिराचा व त्यात घेतलेल्या ज्ञानाचा जीवनात लाभच होणार असून सर्वांनी आप आपल्या घरी मनन व पठण यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे विशेष कौतुक करून सर्व उपस्थितांना पुढील वर्षी जास्तीत जास्त संखेने सहभाग नोंदवावा असे हि आवाहन केले. शेवटी समाप्तीची आरती उमेशअप्पा नित्रुडकर दाम्पत्यांनी केली. सर्व उपस्थितांनी जगद्गुरूच्या दर्शनाचा रांगेतून लाभ घेत महाप्रसादाचाही लाभ घेतला.
सूत्रसंचालन प्रा.महालिंग मेहत्रे यांनी केले तर नागनाथ स्वामी, नागनाथ कोटुळे, डीगांबर स्वामी, प्रकाश जमशेटे, बिराजदार गुरुजी, संतोष निर्मळे, केदार डांगे, प्रभूअप्पा ऐकलारे, शशीकांत स्वामी, उमाकांत मेहत्रे, रतिकांत स्वामी, नागेश नित्रुडकर, नागेश स्वामी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी परिश्रम घेतले. समारंभास महिला व पुरुष भक्तगण तसेच शिबिरार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें