जिंतुर येथील तुबा खान व राफे खानचा पहिला रोजा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 जून 2018

जिंतुर येथील तुबा खान व राफे खानचा पहिला रोजा संपन्न.

जिंतुर येथील तुबा खान व राफे खानचा  पहिला रोजा संपन्न.


जिंतूर/ निशाद आहेमद.
जिंतूर शहरातील पठाण मोहल्ला येथील 6 वर्षीय तुबा शहेजाद खान व जमदार कॉलोनी येथील 7 वर्षीय राफे अतिक खान या दोन चिमुकल्यांनी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून शनिवार 9 जून रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे. रमजान महिन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवून विविध धार्मिक विधींद्वारे अल्हाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात आणि याच महिन्यात चिमुकले ही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच प्रचिती सहा वर्षीय तुबा शहेजाद खान व सात वर्षीय राफे अतिक खान या दोन चिमुकल्यांनी तापत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वी पूर्ण केल्याने झाली आहे. याप्रसंगी हाजी अमानुल्ला खान, ईलयास खान, जिया खान, आसेफ खान, शोएब खान, आतेफ खान, शेख अलीम, जावेद खान, बखत्यार खान, फेरोज खान आदींनी निदाचे कौतुक व अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें