शाळेची मैदाने फुलली.शाळेच्या पहिल्याच दिवशी क्रमिक पुस्तकांचे झाले वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 जून 2018

शाळेची मैदाने फुलली.शाळेच्या पहिल्याच दिवशी क्रमिक पुस्तकांचे झाले वाटप.

शाळेची मैदाने फुलली.शाळेच्या पहिल्याच दिवशी क्रमिक पुस्तकांचे झाले वाटप.

सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१५जून २०१८
उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर राज्यभरात आजपासून शाळांना सुरूवात झाली असुन यामुळे मागील दिड महिन्यांपासुन ओस पडलेली शाळांची मैदाने आता चिमुकल्यांच्या आगमनाने फुलून आली आहेत.
शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसी क्रमिक पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले; यामुळे विद्यार्थ्यांत आनंद व्यक्त केला जात होता.
सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसी उपस्थित विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी छायाचित्रात विद्यार्थ्यांसह पालक सर्वश्री प्रकाश शास्त्री सोनपेठकर, आश्रोबा मुंजाजी गव्हाडे व अन्य दिसत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें